नविन नांदेड। या वर्षाच्या गणेशोत्सव प्रदुषण व पर्यावरण मुक्त साजरा करावा व , ग्रामीण पोलीस स्टेशन येथे आयोजित स्नेहा सलोखा बैठक ही एक महत्वपूर्ण बैठक असल्याचे सांगून,या बैठकीचा आदर्श जिल्ह्यात व शहरी भागातील इतरांनी घ्यावी असे आवाहन केले.
जिल्हा पोलिस दल ,ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत श्री.गणेशोत्त्सव येथे आयोजित स्नेह सलोखा बैठक दि.२७ आगसष्ट रोजी जिल्हा पोलिस अधीक्षक प्रमोद कुमार शेवाळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मनपा सिडको क्षेत्रीय सहाय्यक आयुक्त डॉ. रईसौधदीन, प्रादेशिक परिवहन विभागाचे पद्माकर भालेकर , अग्नीशामक दलाचे एन.डी.गायकवाड, यांच्या सह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक प्रमोद कुमार शेवाळे यांनी नदीपात्रात गणेश मुर्ती विसर्जनमुळे होणारे दुष परिणाम व कायदा बाबत मार्गदर्शन केले.
बैठकीस सामाजिक कार्यकर्ते डॉ.नरेश रायेवार,अवतार सिंग सोडी, माजी जिल्हा परिषद सदस्य गजानन चव्हाण,माजी नगरसेवक अशोक मोरे, सुदर्शन कांचनगिरे,संजय पाटील घोगरे,निवृत्ती जिंकलवाड, साहेबराव मामीलवाड, मखधुकर गायकवाड, शेख एजाज, रफी भाई,निकीता शहापुरवाड, नवनाथ कांबळे, पोलीस पाटील खंडेराव बकाल, शिवाजी सौनटकके सौ, सुमनताई खोसडे,यांच्या सह सामाजिक कार्यकर्ते, गणेश मंडळ पदाधिकारी,पत्रकार,यांच्या सह मान्यवरांच्या उपस्थितीत होती.
प्रास्ताविक मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांनी या वर्षी गुलाल ऐवजी पुष्प वृष्टी करण्याचा संकल्प केला असल्याचे सांगून जातीय सलोखा कायम असल्याचे सांगितले ,तर मंडळ पदाधिकारी संग्राम निलपत्रेवार,प्रा.मधुकर गायकवाड,राजु लांडगे, साहेबराव मामीलवाड,यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिंगाबर शिंदे यांनी केले,या कार्यक्रमास ग्रामीण पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वजीत कासले, उपनिरीक्षक माणिकराव हंबर्डे,आंनद बिचेवार, बि.टी.केद्रे,व गोपनिय शाखेचे अंमलदार बालाजी दंतापलले, बिरादार व पोलीस अंमलदार यांच्यी उपस्थिती होती. या वर्षी शहरी व ग्रामीण भागातील १०७ गणेशोत्सव मंडळ यांनी नोंदणी केली,या बैठकीला शहरी व ग्रामीण भागातील मंडळ पदाधिकारी व सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.