नवीन नांदेड। सिडको येथील युवग्रुपच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येत असते यावर्षी भव्य दंहिहंडीचे आयोजन सिडको पाण्याची टाकी परिसरात दि २९ आँगष्ट रोजी सायकांळी ६ वाजता करण्यात आली आहे. या दंहिहंडी सोहळ्यास मनपाच्या महापौर जयश्रीताई पावडे उपस्थितीत हा सोहळा पारपडणार असल्याची माहीती युवाग्रुपचे संस्थापक तथा युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सतिश पाटील बस्वदे यांनी दिली .
सिडको येथील युवाग्रुपच्यावतीने समाज उपयोगी उपक्रम राबवत सामाजीक चळवळ परिसरात उभी केली आहे,गेल्या दहा ते बारा वर्षापासुन छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्य विविध कार्यक्रामातुन समाजाचे प्रबोधन , डाँ .बाबासाहेब आबेडकर जयंती , लोकशाहीर आण्णा भाऊ साठे जयंती ,स्वच्छ सिडको सुदंर सिडकोतुन कचरा पेटी वाटप, महीलासाठी विविध उपक्रम यासह विविध सामाजिक उपक्रम राबवत युवकाची फळी निर्माण केली आहे. कोरोणा काळात या उपक्रमाला बगल देत त्यांनी समाजातील गरजवंताना मदतीचा हात दिला .
यावर्षी युवा ग्रुपच्यावतीने दि २९ आँगष्ट रोजी सायकांळी सिडको पाण्याची टाकी परिसरत भव्य दंहीहंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे . या सोहळ्यास मनपाच्या महापौर जयश्री पावडे , काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गोविदराव नागेलिकर ,प्रवक्ते संतोष पांडागळे ,उपमहापौर अब्दुल गफार , माजी उपमहापौर विनय पाटील गिरडे , युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष पप्पु पाटील कोंढेकर , विठ्ठल पावडे , नगरसेवक श्रीनिवास जाधव , राजु काळे , उदय देशमुख , सिध्दार्थ गायकवाड , विनोद कांचनगिरे ,ललीता बोकारे, डाँ करुण जमदाडे ,संजय इंगेवाड याच्यासह युवक काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकत्ये यांची उपस्थिती राहाणार आहेत. या दंहिहंडी सोहळ्यास जास्तीत जास्त गोविंदा व गोविंदा पथकानी सहभाग नोंदवावा असे आवाहण युवक काँग्रेस जिल्हाउपाध्यक्ष तथा युवा ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष सतिश पाटील बस्वदे यांनी केले आहे .