श्री इंदरसेठ यांनी आणले शाडू मातीचे गणपती; भक्तांनी स्वइच्छेने पेटित रक्कम टाकायची व गणपती न्यायचा - NNL


नांदेड, अनिल मादसवार
| नांदेडच्या एका कृतिशील व्यक्तीने कलकत्ता वरुन शाडू मातीचे गणपती आणले आहेत. आणि ते सर्व गणपती आपल्या शोरूम मध्ये ठेवले असून, या मूर्तीची किंमत स्वतः भक्तांनी ठरवून समोर असलेल्या दानपेटीत टाकायची आहे. हा जमलेला पैसाही ते गोशाळेत दान देणार आहेत. त्यांच्या या उपक्रमाच नांदेडकर जनतेतून कौतुक होते आहे. 

नांदेडनगरी तशी कृतिशील व्यक्तिमत्त्वासाठी प्रसिद्ध आहे. असेच एक कृतिशील व्यक्तिमत्व म्हणजे क्लासिक मेन्स वेअरचे मालक श्री इंदरसेठ असून, यांच्या सतत डोक्यात नाविन्यपूर्ण कल्पना असते. याचं कल्पनेतून त्यांनी नांदेड नगरीच्या जनतेसमोर एक वेगळा उपक्रम आणला असून, आपला व्यवसाय सांभाळत आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो. हा शुद्ध विचार मनात ठेवून त्यांनी चक्क कलकत्ता वरुन शाडू मातीचे गणपती आणले आहेत. आणि ते सर्व गणपती आपल्या शोरूम मध्ये ठेवले आहेत. सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या मूर्तीची किंमत स्वतः भक्तांनी ठरवून समोर असलेल्या दानपेटीत टाकायची आहे. 

खरं आहे देवाची कुठे किंमत करायची असते का? हा नाविन्य पूर्ण विचार श्री इंद्रजीत सेठ यांनी गणेश भक्तांसमोर ठेवला आहे. 'मूर्ती घेऊन जा मनाने समोरच्या पेटीत पैसे टाका' अशी त्यांची ही सार्थ कल्पना. आणि त्या पेटीतील पैसे ते गोशाळेला दान दिले जातील हा उदात्त विचार त्यांनी नांदेडकर जनतेसमोर मांडला आहे. त्यांचा हा उपक्रम श्री इंदरसेठ यांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल आणखीनच आदर निर्माण करणारा आहे. श्री इंद्रजीत सेठ यांनी सुरु केलेल्या या अभिनव उपक्रमाचे सर्व स्तरातून स्वागत होत असून, गणेश मूर्तीची किंमत करायची नसते. हा प्रेरणादायी संदेश प्रत्येक भक्तांनी मूर्ती विकत घेताना कृपया लक्षात ठेवा अशी विनंती त्यांनी केली आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी