मुखेड शहरासह तालुक्यातील अवैध धंदे बंद करा - मनसे -NNL

मनसे नांदेड जिल्हासचीव गणपती तेलंग यांची तहसीलदारांकडे तक्रार


मुखेड, रणजित जामखेडकर|
मुखेड शहरातील व तालुक्यात अवैद्य मटका , गुटखा , पत्याचे क्लब, अवैध रेती वाहतुक तात्काळ बंद करण्याची मागणी मनसेच्या वत्तीने करण्यात आली आहे.

मुखेड शहरासह तालुक्यातील जांब , सावरगाव (पी.) बाऱ्हाळी, मुक्रामाबाद या ठिकाणी अवैद्य मटका , गुटखा व पत्याचे कलब, अवैधरित्या रेती वाहतुक चालू असुन आपल्या कार्यालयातील काही अधिकारी व कर्मचारी यांच्या संगणमताने चालु असुन या अवैद्य धंद्यामुळे जांब सारख्या ठिकाणी पोलीस चौकीच्या बाजुस जबरी चोरी ऐ तर मुखेड येथील पत्याच्या कल्बवर सशस्त्र दरोड्या पडला यामुळे तालुक्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे.

अवैधरित्या चालू असलेल्या मटक्यामुळे अनेकांची संसार उध्दवस्त झालेले आहेत. तरूण तरुणपिढी बरबाद होत असुन अनेक विद्यार्थी हे वाईट मार्गाला लागलेले आहेत अल्पवयीन विद्यार्थी सुध्दा भरदिवसा खंजर , ऐअरगण सारखे खतरनाक हत्यार घेऊन भरदिवसा धुमाकूळ घालत असुन आपले प्रशासन विभाग मात्र झोपेचे सोंग घेत आहेत . तसेच अवैद्य मार्गाने गुटखा तालुक्यात मोठ्या प्रमाणात विक्री होत असुन संबंधित यंत्रणा मात्र चिरीमिरी घेऊन शांत बसत आहे.

अवैध धंद्येचालक मात्र अमाप संपत्ती जमवुन ब्लॅक काळे पैसे पांढरे करण्यात मग्न आहेत व आपले पोलीस बांधव कुठे तरी टपरीवर धाड मारुन मटका घेणाऱ्या व खेळणाऱ्या लोकावर थातुरमातुर कार्यवाही करून तालुक्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित असल्याचा देखावा तयार करत आहेत.

तालुक्यातील कर्तव्य दक्ष अधिकारी या नात्याने वरील तक्रारीची दखल घेऊन तात्काळ कार्यवाही करावी व चोर सोडून सन्याशाला फाशी देण्याचे प्रकार थांबविण्याची विनंती मनसेच्या वत्तीने करण्यात आली. तालुक्यातील अवैध धंदे बंद नाही केल्यास दि.२२ ऑगस्ट रोजी तिव्र आंदोलन करण्यात येईल अशा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच जिल्हा सचिव गणपतराव तेलंग यांनी तालुका प्रशासनाला दिला आहे.


Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी