भ्रष्टाचाराचे समूळ उच्चाटन करण्यासाठी भाजप निवडणूक लढविणार आणि जिंकणार - आ.राम पाटील रातोळीकर

नगरपंचायत जी.प. निवडणुकीच्या संदर्भाने हिमायतनगरात झाली भाजपची आढावा बैठक 


हिमायतनगर, अनिल मादसवार| मागील ३ वर्षाच्या काळात महाभकास आघाडी सरकारने विकासाचे तीनतेरा वाजवले आहे. केवळ भ्रष्टाचार करून आपला स्वार्थ कसा साधता येईल यावर लक्ष केंद्रित करून आघाडी सरकार चालविले जात होते. ते सरकार पायउतार होऊन शिवसेना शिंदे गट आणि भाजपने मिळून सरकार स्थापन केले आहे. ईडी हि संस्था वेगळी आहे, त्याच्यात शासनाचा काही एक संबंध नाही... कर नाही तर डर कश्याला... ज्यांनी काही पाप केले असले घोटाळे केले असले त्यां विषयी ईडी काम करते. ती संस्था वेगळी आमचा शासन वेगळं विनाकारण काहीतरी बोलायचं अशी अवस्था गेल्या तीन वर्षात आघाडी सरकारने चालविली होती. कुठलाही काम करताना केंद्राकडे बोट दाखवायचा आणि आपल्या मंत्र्याच्या मध्यातून वाझेसारखे अधिकारी नेमून वसुली करायचं असे काम आघाडी सरकारने केली असल्याची सडकून टीका विधानपरिषदेचे आ.राम पाटील रातोळीकर यांनी केले.  


ते हिमायतनगर येयेथे दि.३१ जुलै रोजी नगरपंचायत व जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या संदर्भाने संपन्न झालेल्या भाजपच्या आढावा बैठकीनंतर नांदेड न्यूज लाईव्हशी संवाद साधताना बोलत होते.  यावेळी त्यांच्यासोबत अरुणभाऊ सुकलंकर, भाजप तालुकाध्यक्ष आशिष सकवान, जेष्ठ कार्यकर्ते किशनराव वानखेडे, सुधाकर पाटील, रामभाऊ सूर्यवंशी, वामनराव पाटील मिराशे वडगावकर आदींसह मोठ्या प्रमाणात भाजप कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले कि, नुकतेच ओबीसी आरक्षणाचा तिढा सुटला आहे. जेकि शिवसेना शिंदे गट आणि भाजपच्या माध्यमातून सरकार स्थापन झाले आणि पहिल्या प्रथम ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यात यश आले आहे.  


त्यानंतर २८ जुलैला सर्व नगरपंचायत, नगरपरिषद, जिल्हा परिषद व पंचायत समितीचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. त्यानंतर माझी हिमायतनगर नगरपंचायत निवडणुकीसाठी प्रभारी म्हणून नेमणूक झाली आहे. कुठलीही निवडणूक जिंकली पाहिजे यासाठी पक्षाच्या माध्यमातून प्रत्येकजण प्रयत्न करत असतो. भारतीय जनता पक्ष हा एक असा आहे कि, प्रत्येक निवडणूक जिंकली असा भाजपचा हेतू नाही. पण शेवटच्या माणसाचा विकास साधायचा असेल तर साधन पाहिजे. जोपर्यंत लोकप्रतिनिधी आपल्या विचाराचा राहत नाही तोपर्यंत विकास साधता येत नाही.

एकेकाळी राजीव गांधींनी एका व्यासपीठावर म्हंटल होत कि.. आमही एक रुपया पाठविला तर १६ टक्के सुद्धा पैसे शेवटच्या टोकाच्या माणसाला मिळत नाहीत. ८४ टक्के पैसे हे भ्रष्टाचारामध्ये जातात. हे पैसे न जाता शेवटच्या घटकापर्यंत पोचले पाहिजे यासाठी मोदी सरकारने मागल्या ८ वर्षाच्या काळात यासाठी प्रयत्न केले आहे. कारण दिलेले पैसे हे थेट शेतकरी, शेतमजूर, आवास योजनेचे लाभार्थी, यांच्या खात्यावर मिळाले आहेत. त्यासाठी प्रत्येक निवडणूक जिंकून आपला एक साधन म्हणून शेवटच्या माणसाचा विकास साधायचा आहे. म्हणून या निवडणुकीत उतरणं गरंजेच आहे, त्यानुसार आम्ही प्रयत्न करत आहोंत. जनता आमच्या सोबत आहे. गेल्या निवडणुकीत लोकसभा आणि विधानसभेच्या जास्तीच्या जागा आमच्या निवडून आल्या होत्या.


पण विश्वासघात गद्दारी करून हे महाविकास आघाडीचे सरकार झाले. त्या सरकारने भकास आघाडी म्हणून मागील तीन वर्षात काम केले आहे. त्याच्या काळातील बैकलोक भरून काढण्यासाठी आगामी २ अडीच वर्षाच्या काळात हे काम करायचं आहे. त्यासाठी निवडणूक जिंकायच्या आहेत, त्याचा आपण  साधन म्हणून वापर करून शेवटच्या माणसाचा विकास साधायचा आणि सर्वांगीण विकास करायचं आम्ही प्रयत्न करत आहोत असेही आ.राम पाटील रातोळीकर यांनी म्हंटले. तसेच आतातर सत्तेत आपले सरकार आहे, त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांनी आपसातील असलेले छोटे - मोठे मतभेद बाजूला सारून भाजपचे कमला वजने वाढवावे. जेणेकरून आपल्या भागातील शेवटच्या घटकापर्यंत शासनाच्या योजना पोचवून सर्वांगीण विकास साधता येईल. एकूणच आजच्या या आढावा बैठकीमुळे भाजप कार्यकर्त्यात उत्साह संचारला असून, आपापल्या भागात भाजपाची ताकद वाढविण्यासाठी जोमाने कामाला लागून हिमायतनगर तालुका भाजपमय करून नागरपंचायतीवर सत्ता मिळवू असा विश्वास अनेकांनी या बैठकीत व्यक्त केला आहे. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी