हिमायतनगर। येथील हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने 12 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हरभर तिरंगा उपक्रमा अंतर्गत जनजागरण रॅलीचे आयोजन रासेयो विभागातर्फे करण्यात आले होते.
या रॅलीचे नियोजन महाविद्यालयातून परमेश्वर मंदिर बस स्थानक परिसर येथून पुन्हा महाविद्यालयात परत परत येऊन राष्ट्रगीताने रॅलीची सांगता करण्यात आली. घरोघरी तिरंगा लावून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्याचा संदेश या रॅलीतून देण्यात आला. हर घर तिरंगा उपक्रमांतर्गत महाविद्यालयात देशभक्तिपर गीत गायन स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा आदी स्पर्धेचेही आयोजन रासेयो विभागाच्या वतीने करण्यात आले होते.
सदरील कार्यक्रमांच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. शिवाजी भदरगे सहकार्यमाधिकारी डॉ. एल. बी. डोंगरे तसेच स्टाफ सेक्रेटरी डॉ. डी. के. कदम, क्रीडा संचालक डॉ. दिलीप माने, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. सविता बोंढारे आदींनी परिश्रम घेतले. सदर रॅली मध्ये महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी विद्यार्थिनींनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता.