नांदेड| जालना आणि बदनापूर दरम्यान दिनेगाव या क्रोस्सिंग स्टेशन चे कार्य पूर्ण करण्याकरीता दिनांक 6 आणि 7 ऑगस्ट रोजी ट्राफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे. या मुळे दोन गाड्या उशिरा सुटणार आहेत तर दोन गाड्या उशीरा धावणार आहेत, त्या पुढील प्रमाणे --
१. गाडी संख्या 17650 औरंगाबाद ते हैदराबाद एक्स्प्रेस 06 ऑगस्ट रोजी औरंगाबाद रेल्वे स्थानकावरून 165 मिनिटे उशिरा सुटेल, यामुळे हि गाडी तिची नीयमित वेळ दुपारी 16:15 मिनिटा ऐवजी सायंकाळी 19:00 वाजता सुटेल. २. गाडी संख्या 17650 औरंगाबाद ते हैदराबाद एक्स्प्रेस 07 ऑगस्ट रोजी औरंगाबाद रेल्वे स्थानकावरून 195 मिनिटे उशिरा सुटेल, यामुळे हि गाडी तिची नीयमित वेळ दुपारी 16:15 मिनिटा ऐवजी सायंकाळी 19:30 वाजता सुटेल, ३. गाडी संख्या 17661 काचीगुडा ते रोटेगाव एक्स्प्रेस दिनांक 06 आणि 07 ऑगस्ट, 2022 रोजी परभणी ते जालना दरम्यान 11० मिनिटे उशिरा धावेल. ४. गाडी संख्या 17622 तिरुपती ते औरंगाबाद एक्स्प्रेस दिनांक 06 आणि 07 ऑगस्ट, 2022 रोजी परभणी ते जालना दरम्यान 6० मिनिटे उशिरा धावेल.