नवीन नांदेड। परिसर स्वच्छ ठेवणे ही सामूहिक जबाबदारी आहे या जाणीवेतून एन.सी.सी.52 महाराष्ट्र बटालियनचा वतीने स्वच्छता अभियान कार्यक्रमा अंतर्गत (पुनित सागर अभियान) शिवाजी विद्यालय सिडको,नांदेड व नागार्जुना पब्लीक स्कूल,कौठा नवीन नांदेडच्या एकुण ५३ विद्यार्थ्यांनी विष्णुपुरी काळेश्वर मंदिर देवस्थान येथे २७ आगसष्ट रोजी साफ सफाई अभियान केले.
श्रावण महिन्यात भक्तांची होणारी अलोट गर्दी व भावीक भक्तांनी व विविध व्यावसाय धारकाकडुन झालेल्या कचऱ्याचे निर्मुलन करण्याच्या उद्देशाने विष्णुपुरी येथील काळेश्वर मंदीर प्रांगणात व गोदाकाठी स्वच्छता मोहीम २७ आगसष्ट रोजी राबविण्यात आली.
या स्वच्छता मोहीम कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुभेदार जेमन तर प्रमुख पाहुणे म्हणून विष्णुपुरीचे सरपंच विलासराव हंबर्डे, काळेश्वर देवस्थान चे विश्वस्त धारोजीराव हंबर्डे,कोषाध्यक्ष उत्तमराव हंबर्डे, विश्वस्त बालाजीराव हंबर्डे, विश्वस्त तथा सेवानिवृत्त नायब सुभेदार दत्ता काचमांडे होते.
काळेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने एनसीसी अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी एन.सी.सी.52 महाराष्ट्र बटालियनचे नायब सुभेदार रमन शर्मा,हवालदार त्रिलोकसिंग,हवालदार जगत राम, हवालदार संजयकुमार,हवालदार नरेंद्र कुमार,हवालदार जसवीर सिंग, शिवाजी विद्यालय सिडको,नांदेड येथील सहाय्यक एन.सी.सी. अधिकारी एस,आर, भोसीकर,नागार्जुना पब्लीक स्कूल,कौठा नवीन नांदेडचे सहाय्यक एन.सी.सी.अधिकारी अनिल लष्करे, सहशिक्षक बालाजी पाटोळे यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.