नवीन नांदेड। शारदा भवन शिक्षण संस्थेच्या इंदिरा गांधी हायस्कूल हडको व ज्युनिअर कॉलेज चे मुख्याध्यापक शंकर माचलोड हे ३१ वर्षांचा प्रदिर्घ सेवेनंतर ३१ आगसष्ट २२ रोजी सेवानिवृत्त होत आहेत, त्यांचा सेवानिवृत्त निमित्ताने सेवापुरती सोहळ्याचे आयोजन १ सप्टेंबर रोजी इंदिरा गांधी हायस्कूल येथे मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले आहे.
२२ जुलै १९९१ रोजी इंदिरा गांधी हायस्कूल हडको येथे सहशिक्षक म्हणून सेवेत रुजू झाले, त्यांनी हिंदी व इतिहास या विषयात अध्यापन करून शालांत परीक्षेत या विषयांचा निकाल उत्कृष्ट लावला,१ आगसष्ट रोजी उपमुख्याध्यापक म्हणून इंदिरा गांधी हायस्कूल हडको येथे पदोन्नती झाली तर शारदा भवन हायस्कूल नांदेड येथे १ आकटोबर २००८ ला मुख्याध्यापक म्हणून पदोन्नती मिळाली,व इंदिरा गांधी हायस्कूल हडको येथे १६ जुनं रोजी बदली झाली. सेवा काळात दहावी व बारावीच्या परीक्षा,व विविध परिक्षेत शाळेच्या निकाल धवधवीत लावण्यात त्यांना यश आले,३१ वर्षांचा प्रदिर्घ सेवेनंतर ३१ आगसष्ट रोजी सेवानिवृत्त होत आहेत.
इंदिरा गांधी हायस्कूल हडको येथे शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वतीने १ सप्टेंबर रोजी सेवापुरती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून शारदा भवन शिक्षण संस्थेचे सचिव माजी आमदार डि.पी.सावंत, सहसचिव ऊदयराव निंबाळकर, कोषाध्यक्ष रावसाहेब शेदांरकर, कार्यकारिणी सदस्य पांडुरंग पावडे, नरेंद्र चव्हाण,माजि जिल्हा परिषद अध्यक्षा सौ.मंगाराणी अंबुलगेकर, माजी कृषी संचालक सुरेश अंबुलगेकर व मान्यवरांच्या उपस्थितीत सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
बाबुराव हंबर्डे ४० वर्षांचा प्रदिर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त...
नविन नांदेड।जलसंपदा पाटबंधारे विभागाचे मुकदम बाबुराव विठ्ठलराव हंबर्डे हे ४० वर्षांचा प्रदिर्घ सेवेनंतर ३१ आगसष्ट २२ रोजी सेवानिवृत्त होत असुन सेवानिवृत्ती निमित्त त्यांचा कार्यालयाच्या वतीने सत्कार समारंभ सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
१९८२ रोजी मुकदम या पदावर रुजू झालेले बाबुराव हंबर्डे हे रूजु झाले , त्यांनी आपल्या सेवा काळात ४० वर्ष प्रदिर्घ सेवा बजावुन ३१ आगसष्ट २२ रोजी वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत.