किनवट, माधव सूर्यवंशी| सुप्रिम कोर्टाने स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये ओबीसी आरक्षण बहाल केले व राष्ट्रपती पदी पहिल्या आदिवासी महिला विजयी झाल्याचा उत्सव किनवट भाजपा तर्फे शहरात भव्य रॅली, आतिषबाजी, ढोलताशासह लाडु वाटप करुन साजरा करण्यात आला.
किनवट भाजपा तर्फे आमदार भिमराव केराम यांच्या मार्गदर्शनाखाली दोन्ही आनंदी घटनां आनंदाने साज-या करण्यात आल्या. यावेळी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथिल प्रतिमेला अभिवादन करत मुख्य रस्त्यावरुन रॅली काढण्यात आली होती. तर जिजामाता चौक व भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. यावेळी ढोल ताशांच्या गजरात निघालेल्या रॅली मध्ये मोठ्या प्रमाणात लाडु वाटप करण्यात आले.
यावेळी बोलतांना भाजपाचे तालुका अध्यक्ष संदिप केंद्रे यांनी देशाच्या राष्ट्रपती पदी आदिवासी महिलेला विराजमान केल्या बद्दल भाजपाच्या वरिष्ठ नेतृवाचे आभार व्यक्त केले, तर राज्यातील नविन स्थापन झालेल्या युती शासनाच्या प्रयत्नातुन ओबीसी समाजाला सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण बहाल केल्या बद्दल हि शासनाचे आभार व्यक्त केले.
शहराध्यक्ष श्रीनिवास नेम्मानिवार यांनी यावेळी बोलतांना सांगितले कि भाजपा ने आपले घोषवाक्य सबका साथ सबका विकास हे पुन्हा एकदा सिध्द केले असुन यापुर्वी मुस्लिम समाजाचे शास्त्रज्ञ ए.पी.जे अब्दुल कलाम यांना राष्ट्रपती पदी बसवले त्या नंतर दलित समाजाचे रामनाथ कोविंद यांना संधी दिली तर यावेळी आदिवासी समाजाच्या महिला दौपदी मुर्मु यांना संधी दिल्याने भाजपा बोले तैसा चाले असेच राजकारण करते यामुळे पुन्हा एकदा सिध्द झाले आहे.
यावेळी तालुका अध्यक्ष संदिप केंद्रे, माजी नगराध्यक्ष दिनकर चाडावार, किसान मोर्चाचे सुधाकर, ज्येष्ठ नेते अनिल तिरमनवार, शहराध्यक्ष श्रीनिवास नेम्मानिवार, नगराध्यक्ष आनंद मच्छेवार, युवा मोर्चाचे उमाकांत क-हाळे, माजी उपनगराध्यक्ष अजय चाडावार, नगरसेवक शिवा आंधळे, सभापती दत्ता आडे, कपिल करेवाड, बाळकृष्ण कदम, संजय रेड्डी, शिवा क्यातमवार, नरेश सिरमनवार, विश्वास कोल्हारीकर, ओबीसी आघाडीचे शेखर चिंचोळकर, जय वर्मा, सतिष बिराजदार, परमेश्वर मुराडवार, बालाजी धोत्रे, जितेंद्र कुलसंगे, अशोक नैताम, सुनिल मच्छेवार, अंकुश साबळे, राहुल दारगुलवार, सुनिल चव्हाण, बालाजी चव्हाण, सुरेश साकपेल्लीवार, यांच्यासह अनेक भाजपा कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.