हिमायतनगर| येथील संत तुकडोजी महाराज मंदिरात गुरुपोर्णिमेनिमित्ताने संत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. यावेळी हिमायतनगर येथील जेष्ठ कवी विठ्ठलराव फुलके यांच्या कविता संग्रहाचे प्रकाशन करण्यात आले.
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हिमायतनगर येथील पोलीस स्थानक परिसरात असलेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ध्यान मंदिरात दि.१३ बुधवारी सकाळी ११ वाजता गुरुदेव सेवा मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. यावेळी परमेश्वर इंगळे यांच्या हस्ते सर्व प्रथम राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी जेष्ठ कवी विठ्ठलराव फुलके यांच्या लेखणीतून साकारण्यात आलेल्या जनजागृती भजन संग्रहाचे प्रकाशन देखील करण्यात आले. यावेळी पोत्तना गड्डमवार, गणपत इंगळे, परमेश्वर मादसवार, नंदू पाटील यांची उपस्थिती होती.
कवी विठ्ठलराव फुलके यांच्या जनजागृती भजन संग्रहाचे ५०० प्रति छापण्यात आल्या असून, सर्व वाचकांना त्यांनी भेट म्हणून दिल्या आहेत. यात शैक्षणिकी, निसर्गाच्या कविता, दुष्काळ परिस्थिती, महामानवाच्या जीवनचरित्र, व्यसनमुक्ती, स्वच्छता, विकासात्मक यासह, संत तुकडोजी महाराज यांच्या कार्याची गाथा असलेल्या भजनांचा यात समावेश आहे.