आ.डॉ.तुषार राठोड यांच्या शेतकरी विकास पॅनलचे १३ पैकी १३ उमेदवार प्रचंड मताधिक्याने विजयी
मुखेड, रणजित जामखेडकर। मुखेड विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या निवडणूकित आमदार तुषार राठोड यांच्या शेतकरी विकास पॅनलचा प्रचंड बहुमताने दणदणीत विजय झाला. या निवडणूकीत विरोधी पॅनलचा प्रचंड मताधिक्याने पराभव झाला.
मुखेड विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची आज दि. २४ जुलै रोजी जिल्हा परिषद हायस्कूल शाळेच्या इमारतीत मतदानाची प्रक्रिया पार पडली. भाजपा नेते तथा सेवा सहकारी सोसयटीचे सभापती व्यंकटराव लोहबंदे यांनी आ.डॉ. तुषार राठोड यांच्या शेतकरी विकास पॅनलच्या माध्यमातून निवडणुक लडवली या निवडणुकीत पॅनल प्रमुख व्यंकटराव लोहबंदे, जगन्नाथ कामाजे, अनुसया बंडे,चागोणाबाई सुभेदार आणि सुमनबाई पाटील हे पाच उमेदवार बिनिरोध निवडूण आले. उर्वरित आठ जागेसाठी दि. २४ जुलै रोज रविवारी मतदान घेण्यात आले.असता शेतकरी विकास पॅनलचे आठ उमेदवार ९०० मताने विजयी झाले.
विरोधी पॅनलच्या उमेदवाराला केवळ १४० मते पडली या निवडणुकीत शेतकरी विकास पॅनलचे १३ पैकी १३ उमेदवार विजयी झाले. विजयी उमेदवार- संभाजी कुंडगिर ९०५, व्यंकट दबडे ९१०, हनमंत तेजराव देवकते ९०२, अर्जुन नरोटे ९०५, नारायण पाटील ८८६, रावसाहेब इरवा वडजे ८८३, यशवंत दत्ताराम सुर्यवंशी ८८४, सदाशिव भिमराव हुंबाड ८९४ हे उमेदवार बहुमताने विजयी झाले.
विजयी उमेवारांचे माजी आ. क्रमवीर किशनराव राठोड, आ. तुषार राठोड माजी आ. सुभाष साबणे, माजी नगराध्यक्ष गंगाधर राठोड, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती खुशाल पाटील, पंचायत समितीचे सभापती लक्ष्मण पाटील, भाजपाचे तालुकाध्यक्ष डॉ. वीरभद्र हिमगिरे भाजपचे जिल्हा सरचिटणीस डॉ. माधव पाटील उच्चेकर, भाजपा ओबीसी आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष माधव साठे, वसंत संबुटवार, दत्ता पाटील बेटमोगरेकर, गणेश पाटील जाधव,भाजपचे अध्यक्ष किशोरसिंह चौहाण आदीने विजयी उमेदवाराचे अभिनंदन केले आहे