संत बाबा नरेंद्रसिंघ व संत बाबा बलविंदरसिंघ यांची माहिती
नांदेड। येथील ऐतिहासिक गुरुद्वारा लंगर साहिबच्या वतीने आयोजित करण्यात येत असलेल्या सालाना बरसी उत्सवाची जय्यत तयारी सुरू झाली असून ४ ऑगस्ट रोजी नगीना घाट (नांदेड) येथे हा उत्सव साजरा होणार आहे. या उत्सवा निमित्ताने पंजाब येथून अनेक संत महापुरुष व भक्त मंडळी येणे अपेक्षित आहेत.
यावर्षीची बरसी २,३,४ ऑगस्ट 2022 या दरम्यान नांदेड येथील लंगर साहिब गुरुद्वारा मध्ये साजरी होणार आहे. लंगर साहिबचे संस्थापक संत बाबा निधानसिंघजी,संत बाबा हरणामसिंघजी, संत बाबा आत्मासिंघजी व संत बाबा शीशासिंघजी कारसेवावाले यांची सालाना बरसी साजरी करण्यात येनार आहे. लंगर साहिबचे प्रमुख जथेदार संत बाबा नरेंद्रसिंघ आणि संत बाबा बलविंदरसिंघ यांच्या मार्गदर्शनना खाली हा उत्सव साजरा होतो आहे. बरसी निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. कीर्तन, प्रवचन, रागी जथे, लंगर महाप्रसाद आदी कार्यक्रमाचा या उत्सवात समावेश राहणार असल्याचे संत बाबा नरेंद्रसिंघ आणि संत बाबा बलविंदरसिंघ यांनी सांगितले.
सचखंड गुरुद्वाराचे मुख्य पुजारी सिंघ साहिब संत बाबा कुलवंतसिंघ व पंचप्यारे साहेबांन, संत बाबा गुरूदेवसिंघ शहिदीबाग आनंदपूर साहिब, नानकसर संप्रदाचे मुखी संत बाबा घालासिंघ, संत बाबा जोगा सिंघ कर्नालवाले,संत बाबा महेंद्रसिंघ अयोध्या, संत बाबा रवींद्रसिंघ नानकसरवाले,बुड्डा दल वाले संत बाबा जसासिंघ,संत बाबा अवतारसिंघ विबीचंद,माता साहिब गुरुद्वारा चे जथेदार संत बाबा तेजासिंघ,गुरुद्वारा बोर्डाचे अध्यक्ष तथा माजी पोलीस महासंचालक डॉ सरदार परविंदरसिंघ पसरीचा यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
या उत्सवात सहभागी व्हावे असे आवाहन गुरुद्वारा लंगर साहिब चे मुख्य जथेदार संत बाबा नरेंद्रसिंघ व संत बाबा बालविंदरसिंघ यांनी केले आहे.. लंगर साहिब गुरुद्वाराच्या सालाना बरसी उत्सवाची जय्यत तयारी सुरू करण्यात येत आहे. लंगर साहिब गुरुद्वाराच्या सेवा नांदेडकरांसाठी भूषण आहेत. सालाना बरसी या उत्सवाला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. देश विदेशातुन भावीक या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी खास करून येत असतात असे संत बाबा नरेंद्रसिंघ आणि संत बाबा बलविंदरसिंघ यांनी सांगितले.