अर्धापूर, निळकंठ मदने| तालुक्यातील मालेगाव परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध धंद्यांना ऊत आला असून मालेगाव जिल्हा परिषद शाळेच्या आवारात मोठ्या प्रमाणात दारू व मटका यासह अन्य अवैध व्यवसाय मोठ्या प्रमाणत वाढले आहेत. त्यामुळे शालेय विद्यार्थी व नागरिकात भीतीचे वातावरण आहे. अवैध धंद्यामुळे मालेगाव परिसरात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. याकडे प्रशासन दुर्लक्ष करीत आहे.
पोलीस प्रशासनही आर्थिक व्यवहारात मग्न असल्याने मालेगाव परिसरात मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी क्षेत्र वाढत आहे.अवैद्य धंदे चालकांवर कोणत्याही प्रकारची कार्यवाही सुद्धा केली जात नाही. यामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य व ग्रामस्थांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण, दहशत यामुळे सदर ठिकाणी चालणारे दारू, मटका व अन्य अवैध धंदे तात्काळ बंद करून मालेगावातील नागरिकांना न्याय द्यावा. या मागणीचे लेखी निवेदन गावातील ग्रामस्थांच्या वतीने सरपंच व तहसीलदार यांना देण्यात आले.
या अवैध व्यवसायावर तात्काळ कार्यवाही करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. निवेदन देताना प्रमोद इंगोले, कृष्णा इंगोले, प्रदीप इंगोले, आशिष इंगोले, देवा इंगोले, रामकृष्ण इंगोले, गणेश इंगोले, सचिन इंगोले, दीपक इंगोले, शुभम निदानकर, विठ्ठल इंगोले, सतीश इंगोले, गणेश इंगोले, ऋषिकेश इंगोले, प्रसाद इंगोले, पवन इंगोले, साई इंगोले, वैभव इंगोले, विठ्ठल इंगोले, संभाजी इंगोले यांच्यासह ग्रामस्थांच्या सह्यांचे लेखी निवेदन देण्यात आले. यावेळी गावातील नागरिक उपस्थित होते.