भारतीय विद्या भवन,इन्फोसिस फाऊंडेशनचा सांस्कृतिक प्रसार कार्यक्रम
पुणे। भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत आयोजित,मृदुला मोघे प्रस्तुत ' हिंदोळा..स्वर, शब्दांचा ' या कार्यक्रमास शनिवारी सायंकाळी चांगला प्रतिसाद मिळाला.या कार्यक्रमात बंदिश,नाट्यगीते, अभंग,हिंदी-मराठी नाट्य गीते यांचे सुरेल सादरीकरण करण्यात आले.
कलावती रागातील बंदीशीने कार्यक्रमाची सुरुवात झाली. आषाढी एकादशी निमित्त 'अबीर गुलाल उधळीत रंग' या अभंगाने रसिक भक्तीरसात न्हाऊन निघाले. यानंतर 'सूर तेच छोडीता', 'जा जा जा रे नको बोलू जा ना', 'शारद सुंदर चंदेरी राती', 'मनाच्या धुंदीत','जांभूळ पिकल्या झाडाखाली' अशा मराठी गाण्यानंतर काही अप्रतिम हिंदी गाणी सादर करण्यात आली. यामधे 'आईये मेहरबॉं', 'कैसी पहेली','छू कर मेरे मन को',' गुलाबी आँखे','मेरे सपनों की रानी 'अशी गीते सादर झाली. कार्यक्रमाची सांगता ' सजदा करू ' या गाण्याने झाली.
मृदुला मोघे यांच्यासह अभिजित नांदगावकर यांनी गीते सादर केली. नितीन पवार यांनी सिंथेसायझर ,अमित जोशी यांनी तबला आणि रिदम वर साथसंगत केली. प्राची घोटकर यांनी सूत्रसंचालन केले. मृदुला मोघे यांनी 'एका पेक्षा एक ' मधील एक व्यक्तीरेखा एकपात्री मधून सादर करून रसिकांची दाद मिळवली. हा कार्यक्रम शनीवार, ९ जुलै रोजी २०२२ रोजी सायंकाळी ६ वाजता भारतीय विद्या भवनचे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह,(सेनापती बापट रस्ता) येथे झाला.
हा कार्यक्रम विनामूल्य होता.भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत सादर होणारा हा १२८ वा कार्यक्रम होता.भारतीय विद्या भवनचे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी प्रास्ताविक केले. भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या वतीने सहभागी कलाकारांचा ज्ञानेश्वरीची प्रत आणि प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला.