नांदेड| श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटीत प्राचार्य पदावरून निवृत्त झाल्यावर खजीनदार म्हणून सेवा देणारे डॉ.रावसाहेब शेंदारकर यांचा दि.13 जुलै 2022 बुधवार रोजी सायंकाळी 6 वाजता, कुसूम सभागृह, नांदेड येथे मान्यवरांच्या उपस्थितीत अमृत महोत्सवी वर्षानिमित्त त्यांचा सपत्नीक विशेष सत्कार संपन्न होणार असल्याची माहिती मुख्य संयोजक रूपेश पाडमुख यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
मीमांसा फाऊंडेशन, व्हाईस ऑफ मिडीया, समीक्षा, मंथन क्रिएटिव्ह ग्रुप व ह्यूमन राईट्स फाऊंडेशनच्या वतीने दरवर्षी भारताचे माजी गृहमंत्री, मराठवाड्याचे भगीरथ, पाणीदार व्यक्तीमत्व श्रद्धेय डॉ.शंकररावजी चव्हाण यांच्या जयंती निमित्त देण्यात येणार्या डॉ.शंकररावजी चव्हाण गुरूरत्न पुरस्कार सोहळ्यात माजी प्राचार्य डॉ.रावसाहेब शेंदारकर व प्रा.सौ.विद्याताई चव्हाण शेंदारकर यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे.
अर्धापूर येथील शंकरराव चव्हाण महाविद्यालयात एका तपापेक्षा अधिक काळ प्राचार्य पद सांभाळल्या नंतर डॉ.शेंदारकर आता खजीनदार म्हणून सेवा देत आहे. विशेष म्हणजे 2022 हे वर्ष श्री व सौ. शेंदारकर यांचे अमृत महोत्सवी वर्ष तर आहेच शिवाय त्यांच्या लग्नाचा पन्नासावा वाढदिवस आहे. हा दुग्ध शर्करा योग आल्याने त्यांचा विशेष सत्कार संपन्न होणार आहे.
तरी सदरील पुरस्कार सोहळ्याला सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन मंथन क्रिएटिव्ह ग्रुपचे रामेश्वर धुमाळ, प्रदेश प्रभारी अरविंद जाधव, मराठवाडा अध्यक्ष सखाराम कुलकर्णी, माजी पदाधिकारी सरवर खान, सौ.संगीताताई बारडकर, सौ.उज्वला दर्डा, सौ.जयश्री राठोड, सौ.सविता गबाळे, श्रीमती उषा हडोळतीकर, सौ.अरूणा पूरी, सौ.प्रणीता भरणे, शिवहरी गाढे तथा संपादक रूपेश पाडमुख यांनी केले आहे.