कोट्यवधी रुपायाचा निधी असलेला....हदगावातील हातवटी नाल्याच्या बोगस कामाची चौकशी करा -NNL

एमआयएम ता.अध्यक्ष अहेमद चाऊस यांनी निवेदनाद्वारे केली मागणी 


हदगाव, शे चांदपाशा |
हदगाव शहरातील मुख्यहातवटी नाल्याचे आरआरसीचे काम अत्यत निकृष्ट दर्जाचे कोणत्याही प्रकारचे नियोजन न करता घाईगडबडीत उरकण्यात येत आहे. या कामाची उच्चस्तरीय चौकशी करुन संबधीत कञाटदारावर कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली आहे. याबाबत कारवाई न झाल्यास ४ जूलै २०२२  पासुन उपोषणाणास बसण्याचा ईशारा एमआयएमचे तालुका अध्यक्ष शे अहेमद यांनी एका निवेदनद्वारे दिला होता. पण तहसिलदार तथा तालुका दडाधिकारी कडुन चौकशीचे आश्वसन दिल्याने त्यांनी काही दिवसा करिता उपोषण मागे घेतले आहे.

या बाबतीत माहीती अशी की, हदगाव शहरातील मुख्य हतवटी नाल्याचे काम अर्धवट करण्यात आले होते. यामध्ये मुस्लिम बहुल भागातच हे काम अपुर्ण होते परिणाम स्वरुप दत्तबर्डी माळारानाचे  पावसाळ्याचे पाणी तेथील रहवाशीच्या घरात जात होता. यामुळे नेहमी रहवाशाची समस्या निर्माण होत असल्याने हदगाव विधानसभा क्षेञाचे आ माधवराव पाटील जवळगावकाराच्या पुढाकाराने हा नाल्याचा सुमारे १ कोटी ७५ लाख रु. जवळपास निधी मंजुर करण्यात आला होता. ही बाब न.पा.प्रशासनामार्फत गोपनिय ठेवण्यात आली होती. सदरील काम न.पा.प्रशासन की सार्वजनिक बाधकाम विभागकडे वर्ग करण्यात आले. या बाबतीत काहीच माहीती देण्यात येत नव्हती.

हे काम पावसाळ्याच्या तोडावर घाईघाईने करण्यात येत असल्याने ही बाब नागरिकांच्या दृष्टीस पडल्याने या बाबतीत संबंधित प्रशासनाकडे अनेक नागरिकांनी नाल्याचे होत असलेल्या बोगस काम बद्दल तक्रारी केल्या. परंतु नेहमी प्रमाणे न.पा. प्रशासनाने दखल घेतली नाही घाईघाईने कामास भरपाऊसात सुरुच ठेवले होते. शेवटी एमआयएमचे तालुका अध्यक्ष यांनी २९ जुन २०२२ रोजी या बोगस कामाच्या जिल्हाअधिकारी नादेडला या बाबतीत निवेदन देऊन तक्रार केली. नेहमी प्रमाणे जिल्हाप्रशासनाने कोणत्याही प्रकारे दखल न घेतल्याने त्यांनी सदरील बोगस कामाची चौकशी न झाल्यास ४ जुलै २०२२ रोजी उपषोणास बसण्याचा इशारा दिला होता.

त्या अनुषंगाने उपोषण स्थळी हदगाव तालुक्याचे तहसिलदार तथा दडाधिकारी जिवराज डापकर यांनी सदरील कामाच्या बाबतीत संबंधितांना लेखी जाब विचारल्या जाईल असे आश्वसन त्यांनी दिले. त्यामुळे काही काळपुरत एमआयएमचे तालुका अध्यक्ष अहेमद चाऊस यांना दिल्याने त्यानी उपोषण मागे घेतले यावेळी शहरातील काही प्रतिष्ठित नागरिक व पञकार उपस्थित होते.

एमआयएम तालुका अध्यक्ष अहेमद चाऊस

हदगाव शहरातील मुख्य हतवटी नाल्याचा आरसीसीचे काम हे नगरपरिषद करते की, सार्वजनिक बाधकाम विभागाकडे वर्ग करण्यात आले. याबाबतीत काहीच माहीती प्रशानकडुन देण्यात येत नाही किवा तिथे बोर्डपण लावण्यात आलेल नाही. हे काम कोणत्या योजनेअंतर्गत आहे सदरिल काम हे मुस्लिम बहुल भागात असल्याने या भागात फार गरीब रहवाशी आहेत. या नाल्यात दत्तबर्डीच्या माळरानाच्या पाण्याचा प्रवाह खुप जोराने येत असतो. परिणाम स्वरुप पावसाळ्यात अनेकाच्या घरात पाणी जात यामुळे अनेक समस्यां निर्माण होत आहे असे मत एमआयएम तालुका अध्यक्ष अहेमद चाऊस यांनी व्यक्त केले. 

 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी