मुखेड, रणजीत जामखेडकर| मुखेड तालुक्यातील मौजे शिरूर दबडे येथील शेतकरी संग्राम गोविंद टाळीकोटे वय वर्षे ७० यांचा पुराचा पाण्याचा अंदाज न आल्याने वाहून जाऊन मृत्यू झाला आहे.
आपल्या शेतीतील पीकांची पाहणी करण्यासाठी शेताकडे जात असताना वाटेतील नाल्यांच्या पुराचा अंदाज न आल्याने शिरूर (दबडे) येथील शेतकऱ्यांचा पुराच्या पाण्यात वाहून जाऊन मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. यामुळे परिसरातील गावांमध्ये अत्यंत हळ हळ व्यक्त केली जात आहे. घटनास्थळी महसुल विभागाचे अधिकारी पोलिस अधिकारी दाखल होऊन घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मुखेड येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.