पर्यावरण संरक्षण हे प्रत्येक नागरिकांचे आद्य कर्तव्य आहे- सहाय्यक जिल्हाधिकारी सौम्या शर्मा


मुखेड, रणजित जामखेडकर|
शहरातील नगर परिषद , मुखेड व महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रम राबविण्यात आला आहे. पर्यावरण संरक्षण हे माणसाला आनंदी आयुष्य जगण्यासाठी आवश्यक आहे . त्याकरिता योगदान देणे प्रत्येक नागरिकांचे आद्य कर्तव्य आहे असे विचार सहाय्यक जिल्हाधिकारी सौम्या शर्मा यांनी प्रतिपादित केले.

महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना हा विभाग सामाजिक व राष्ट्रीय जाणीव उराशी बाळगत आपले योगदान देत आहे . नगर परिषद व महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमानाने मुखेड - बारहाळी रोडवर नगर परिषदेच्या जलशुद्धीकरण केंद्रातील परिसरात शुध्द वातावरण व पर्यावरण संरक्षण करण्यासाठी वृक्षारोपण उपक्रम राबविण्यात आला आहे . याप्रसंगी सहाय्यक जिल्हाधिकारी सौम्या शर्मा , तहसीलदार काशिनाथ पाटील , मुख्याधिकारी धनंजय थोरात , एपीआय गजानन काळे , महाविद्यालयाचे रासेयो कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ. चंद्रकांत एकलारे , प्रा.डॉ. भारत केंद्रे , प्रा.सौ.नयना चवळे , बलभीम शेंडगे , फुलवळकर , गौरव जाधव इत्यादी नगर परिषद , तहसील कर्मचारी यांची उपस्थिती होती . 

सहाय्यक जिल्हाधिकारी सौम्या शर्मा यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पर्यावरण संरक्षण करण्यासाठी आणि महाविद्यालयात " ईको क्लब " स्थापन करण्याच्या सूचना करण्यात आले . महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडे खुप अंतर्गत क्षमता , कल्पकता , जिद्द , मेहनत करण्याची तयारी असते . ती गुणवत्ता समाजातील समस्या सोडवण्यासाठी व पर्यावरण संरक्षण करण्यासाठी आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे असे विचार व्यक्त केले . मुख्याधिकारी थोरात यांनी जलशुद्धीकरण केंद्राचे महत्त्व , शुध्द पाणी , स्वास्थ्य आरोग्य , ' झाडे लावा झाडे जगवा ' मोलाचा सल्ला दिला आहे . 


Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी