नांदेड येथून अमरनाथ यात्रेला गेलेलं सर्व यात्रेकरू सुखरूप-एड दिलीप ठाकूर -NNL


अमरनाथ।
अमरानथमधील पवित्र गुहा परिसरात आज ढगफुटी झाली असून, येथे ८ जणांचा मृत्यू झाला आहे. ढगफुटी झालेल्या भागामध्ये अनेक भाविक अडकले असून बचावकार्य सुरु आहे.  पवित्र अमरनाथ गुहेपासून दोन किलोमीटरवर ही ढगफुटी झाली आहे. दरम्यान नांदेड येथून भोले बाबांच्या दर्शनासाठी गेलेले 105 यात्रेकरू सुखरूप असून, काल दर्शन घेऊन निघालो असल्याची माहिती एड दिलीप ठाकूर यांनी दिली आहे.


अमरनाथ गुहेच्या परिसरात आज संध्याकाळी ५.३० वाजता ढगफुटी झाली. ढगफुटीमुळे अचनाक पाणी आल्यामुळे येथे एकूण ८ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये तीन महिला तर दोन पुरुष भाविकांचा समावेश आहे. या घटनेनंतर अनेक यात्रेकरून अडकले असून एनडीआरएफ तसेच एनडीआरपी टीमच्या जवानांकडून बचावकार्य केले जात आहे. या घटनेबाबात काश्मीरचे आयजीपी विजय कुमार यांनी अधिक माहिती दिली आहे. “पवित्र गुहेच्या परिसरात ढगफुटी झाल्यामुळे गुहेच्या पायथ्याशी असलेले काही टेंट पाण्यात वाहून गेले आहेत. जखमी झालेल्या भाविकांना हवाई रुग्णवाहिकेच्या माध्यमातून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे.


नांदेड येथून 105 यात्रेकरू दर्शनासाठी गेले आहेत, त्यामुळं या सर्वांची नांदेड वासीयांना काळजी वाटत होती, दरम्यान यात्रेकरूंना घेऊन सोबत गेलेले एड दिलीप ठाकूर यांनी आम्ही सर्व सुखरूप आहोत, कालच भोले बाबांचं दर्शन घेऊन आज श्रीनगर वैष्णोदेवी दर्शनासाठी कतरा येथे जात असल्याचे सांगितले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी