वन स्टेशन वन प्रॉडक्ट स्टॉल संधीचा लाभ घ्यावा -NNL

नांदेड विभागातील विविध रेल्वे स्थानकांवर आज नवीन स्टॉल सुरु


नांदेड।
केंद्र सरकारने एक स्टेशन एक उत्पादन” ही संकल्पना जाहीर केली आहे. प्रत्येक रेल्वे स्थानक हे प्रमोशनल हब बनवणे आणि स्थानिक उत्पादनाचे प्रदर्शन करणे हा या संकल्पनेचा मुख्य उद्देश आहेज्यामुळे स्थानिक कारागीरकुंभारविणकर/हातमाग विणकरआदिवासीयांचे वर्धित जीवनमान आणि कल्याण प्रदान करून स्थानिक उद्योगांना मोठी चालना मिळेल. रेल्वे स्थानके एका निश्चित केलेल्या स्टॉलच्या स्वरूपात विपणन वाहिनी म्हणून काम करतील ज्याद्वारे विशिष्ट क्षेत्रासाठी वेगळे असलेले स्थानिक उत्पादन विकले जाईल.

उपक्रमाचा उद्देश स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देणे आणि त्यांची उत्पादने विकणे हे आहे. त्यानुसारनांदेड रेल्वे  विभाग इच्छुक स्वयंसेवी संस्थाबचत गटहातमाग उत्पादने/हस्तकला/साड्या/वस्त्रांना प्रोत्साहन देणारी संस्था आणि इतर संस्था यांच्याकडून अर्ज मागवत आहे. या अंतर्गत आज दिनांक 8 जुलै रोजी, नांदेड विभागातील काही रेल्वे स्थानकांवर हे  वन स्टेशन वन प्रॉडक्ट अंतर्गत काही स्टॉल सुरु करण्यात आले.

नांदेड रेल्वे स्थानकावर मराठवाडा खादी ग्रामोद्योग यांच्या स्टॉल चे उद्घाटन श्री उपिंदर सिंघ, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, नांदेड यांनी केले. या प्रसंगी श्री जय पाटील, वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक, नांदेड, श्री पी.सी. रुद्र , वरिष्ठ इंजिनियर, नांदेड, श्री जय शंकर चौहान, विभागीय कार्मिक अधिकारी, नांदेड समवेत विविध रेल्वे कर्मचारी उपस्थित होते

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी