जिल्हा कारागृहातील बंदीजणांसाठी विशेष तपासणी शिबिर -NNL

33 महिला बंदीजणांची झाली तपासणी


नांदेड। 
जिल्हा कारागृहात असलेल्या बंदीजणांच्या आरोग्याची योग्य ती काळजी घेण्यासह कुणाला जर गंभीर आजार असेल तर त्याचे लवकर निदान करता यावे या उद्देशाने आज जिल्हा कारागृहात विशेष आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. 

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन.आय. भोसीकर यांच्या मार्गदर्शनाखाली या शिबिरासाठी नेमण्यात आलेल्या पथकाकडून एनसीडी वैद्यकीय अधिकारी यांच्यामार्फत उच्चरक्तदाबमधुमेहएचआयव्ही इत्यादीची तपासणी करण्यात आली. या शिबिरात उच्चरक्तदाब व मधुमेहाचे निदान झालेल्या बंदीजणांवर त्वरीत औषधोपचार सुरु करण्यात आले.

संपूर्ण कैद्यांची  जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय पथकामार्फत नियमित तपासणी केली जाते. याचबरोबर दररोज वैद्यकीय अधिकारी कैद्यांच्या आरोग्यासाठी उपलब्ध असतात. कोरोनाच्या विविध मर्यादानंतर आता एकत्रित आरोग्य तपासणी शिबिर सुरु करण्यात येत असल्याची माहिती कारागृह अधिक्षक एस.एम. सोनवणे यांनी दिली.

या आरोग्य शिबिरात एनसीडी वैद्यकीय अधिकारी डॉ. विखारुनिसा खानभूलतज्ञ डॉ. सोनाली जाधवसमुपदेशक सुवर्णकार सदाशिवप्रयोगशाळा तंत्रज्ञ संतोष बेटकरअधिपरिचारिका प्रियंका झगडेएसटीडी समुपदेशक उषा वानखेडे यांनी बंदीजणांची आरोग्य तपासणी केली. यावेळी तुरुंगाधिकारी तुकमेऔषध निर्माण अधिकारी आर. के. देवकत्तेमहिला रक्षक टेकुळे व ताई बिनवडे यांनी सहकार्य केले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी