पोलिस निरीक्षक ज्ञानोबा देवकते यांचे प्रतिपादन
उस्माननगर, माणिक भिसे। यावर्षी आषाढी एकादशी व बकरी ईद हे सण एकाच दिवशी आले असून, उस्माननगर परिसरातील नागरिकांनी धार्मिक सलोखा आणि शांतता अबाधित कायम ठेवत एकात्मतेच्या भावनेने हे दोन्ही सण उत्साहात साजरे करावेत असे आवाहन उस्माननगर पोलिस स्टेशनचे स.पोलिस निरीक्षक ज्ञानोबा देवकते यांनी गावातील प्रमुख मार्गाने पथसंचलन काढून केले.
आषाढी एकादशी ,बकरी ईद, आणि गुरू पोर्णिमा या सणाच्या पार्श्र्वभूमीवर उस्माननगर येथील पोलिस स्टेशनच्या हद्दीत प्रमुख मार्गाने पथसंचलन काढून रॅली काढण्यात आली होती. ठाण्यात शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी सपोनि देवकते म्हणाले , की आषाढी एकादशी व बकरी ईद हे दोन्ही सण एकत्र आले असून सणाच्या दिवशी कोणाची ही धार्मिक भावना दुखावल्या जाणार नाही ; याची काळजी घेत नागरिकांनी धार्मिक सलोखा आणि शांतता अबाधित ठेवण्यासाठी हे सण उत्साहात साजरे करावे. कुर्बानी करताना मुस्लिम बांधवांनी योग्य ती काळजी घेऊनच मित्र ,सगे सोयरे यांना वाटप करावे , कोणाला त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी असे आवाहन श्री देवकते यांनी केले आहे.