किनवट मध्ये चाळीस सफाई कर्मचाऱ्यांना रेनकोट वाटप -NNL


किनवट, माधव सूर्यवंशी|
पावसाळ्यात संसर्गजन्य रोगास प्रतिबंध करण्यासाठी स्वच्छता महत्त्वाची आहे. पावसामुळे स्वच्छतेत बाधा येऊ नये म्हणून घनकचरा व्यवस्थापन विभागातील बदली, रोजंदारी, झाडूवाले, गटार बिगारी, सफाई कर्मचाऱ्यांना नगराध्यक्ष आनंद मच्छेवार प्रभारी मुख्याधिकारी डॉ. मृणाल जाधव यांच्या पुढाकारातून चाळीस सफाई कर्मचाऱ्यांना रेनकोट वाटप करण्यात आले आहे.    

सफाई कर्मचाऱ्यांना पहिल्यांदाच रेनकोट मिळत असल्याचे नगराध्यक्ष आनंद मच्छेवार यांच्याकडून सांगण्यात आले चाळीस कर्मचाऱ्यांना रेनकोट देण्याचे नियोजन केल्यामुळे सफाई कर्मचाऱ्यांनी पालिका प्रशासनाचे आभार मानले यामुळे पावसाळ्यात मलेरिया, डेंग्यू यांसारख्या संसर्गजन्य आजार पसरवण्यापासून प्रतिबंध करता येईल तसेच नगरपालिका सफाई कर्मचाऱ्यांना पावसापासून सरंक्षण मिळेल यासाठी सामाजिक बांधिलकी जपून पालिका प्रशासनाने रेनकोट वाटप करून एक आदर्श निर्माण केला आहे.                                                         

या रेनकोट वाटप प्रसंगी नगराध्यक्ष आनंद मच्छेवार, प्रभारी मुख्याधिकारी तथा तहसीलदार डॉ. मृणाल जाधव, उपाध्यक्ष व्यंकट नेम्मानीवार, माजी उपाध्यक्ष श्रीनिवास नेम्मानीवार, नगरसेवक अभय महाजन, अजय चाडावार,  साजिद खान, जाहीरोद्दीन खान, नरेद्र सिरमनवार, शिवा आंधळे, शिवा क्यातमवार, बालाजी धोतरे यांच्यासह सर्व महिला नगरसेवीका, नगरसेवक,  स्वच्छता निरीक्षक चंद्रकांत दुधारे शेख रियाज व पालिका प्रशासनातील कर्मचारी वृंद उपस्थित होते.  

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी