प्रेम संबंधाच्या कारणावरून युवकांची आत्महत्या; त्रास देणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल -NNL


नांदेड|
प्रेम संबंधाच्या कारणावरून मुलीच्या भावाने आणि वडीलांनी भांडण करून मारहाण केल्याच्या  त्रासाला कंटाळून प्रेमी युवकाने आत्महत्या केली आहे. गोविंद पिराजी बादेवाड वय ३० वर्ष असे मयत युवकचे नाव आहे. या प्रकरणी दोघांविरुध्द बिलोली ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, दि. २० जुलै रात्री ९ ते २१ जुलैच्या पहाटे ६ वाजेदरम्यान बिलोली तालुक्यातील मौजे बामणी येथील गोविंद पिराजी बादेवाड वय ३० वर्ष या युवकाने आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी मयत गोविंदची आई देऊबाई पिराजी बादेवाड यांनी दिलेल्या तक्रारीवरून आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे सांगण्यात आले आहे. गळफास घेवून आत्महत्या केलेला त्यांचा मुलगा गोविंद बादेवाडचे यांचे प्रेम संबंध होते. 

या प्रेम संबंधाची कुणकुण लागल्यानंतर त्या युवतीचे वडील सुभाष गुजेवाड आणि भाऊ शंकर गुजेवाड दोघे रा.बामणी (बु) ता.बिलोली यां दोघांनी संगनमत करून गोविंद बादेवाड यास शिवीगाळ करून मारहाण केली. आणि वारंवार त्रास दिला, या त्रासाला कंटाळून युवकाने गळफास घेवून आत्महत्या केली आहे. यास कारणीभूत असलेल्या दोघांवर बिलोली पोलीसांनी कलम ३०६, ३४ भादवी अनुसार दाखल केला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस निरिक्षक शिवाजी डोईफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक रायपल्ले मैडम या करत आहेत. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी