अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त वृद्धाश्रमात फळे वाटप -NNL


किनवट, माधव सूर्यवंशी|
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा विद्यमान विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त माजी आमदार प्रदीप नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या  वतीने युवानेते बालाजी बामणे यांनी किनवट येथील संथागार वृद्धाश्रमात फळे वाटप करून परिसरात वृक्षारोपण करण्यात आले आहे

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा विरोधी पक्ष नेते अजितदादा पवार यांचा वाढदिवस आज किनवट येथे विविध उपक्रम राबवून मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरा करण्यात आला असून, या वाढदिवसा निमित्त माजी आमदार प्रदीप नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने तरुण, तडफदार युवानेते बालाजी बामणे यांनी शेकडो कार्यकर्त्या समवेत किनवट येथील संथागार वृद्धाश्रमात वृद्धांना फळे वाटप करण्यात आली. 

तसेच आश्रमाच्या परिसरात वृक्षारोपण करून अजितदादा यांच्या दीर्घायुष्यासाठी कामना केल्या. अजितदादा पवार यांचे नेतृत्व सर्वसमावेशक असून त्यांच्या खंबीर नेतृत्वामुळे महाराष्ट्राच्या विकासाला मोठ्या प्रमाणात चालना मिळाली.  नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या विकासाची घोडदोड कायम राहावी. यासाठी त्यांना दीर्घायुष्य लाभो अशा भावना बालाजी बामणे यांनी याप्रसंगी व्यक्त केल्या आहेत.

या कार्यक्रमास राष्ट्रवादीचे राज्य समन्वयक जयवंत वानोळे, जिल्हा कार्याध्यक्ष बंटी पाटील जोमदे, माजी नगराध्यक्ष अरुण आळंणे, आशिष नाईक, अमोल जाधव, सुरज भालेराव, गणेश गाजलवार, राहुल माने, मोनीश दंडोरे, गुरु पवार यांच्यासह राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी व  कार्यकर्ते शेकडोंच्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी