नविन नांदेड। आषाढी एकादशीच्या निमित्ताने वासवी व वनिता क्लब यांच्या वतीने १० जुलै रोजी हडको येथील गोविंद गार्डन येथे सायंकाळी६ वाजता गजर हरिनामाचा स्वराजंली गुप्र सिडको हडको चा वतीने आयोजित करण्यात आला आहे.
दरवर्षी प्रमाणे याही वर्षी आषाढी एकादशीच्या दिवशी गजर हरिनामाचा सुरेल भक्ती गिताचा कार्यक्रम चे आयोजन करण्यात आले आहे, यात सहभागी कलावंत हभप टाकीलवाड गुरूजी,विलास भोसले, औदुंबर सुर्वे,हभप गणेश महाराज,साई शाम काकीलवाड, ऊतम कांबळे,कुलदीप कोतापल्ले, गोविंद महाराज धोतरेकर,विघाताई पेटकर,सौ.अनुराधा जोशी,सौ.सपना अंबेगावकर,सौ.अंजली खिलारे भिसे,सौ.वंदना खिलारे हाटकर,नालंदा सांगविकर,सौ.सुप्रिया प्रसाद जोशी हे सहभागी होणार आहेत.
कार्यक्रमाचे सौजन्य वासवी सुपर मार्केट पंतजली प्रोडेकट वितरक रोहीत रेवणवार यांनी केले आहे. या कार्यक्रमास समाज बांधवांनी व नागरीकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन वासवी क्लबचे अध्यक्ष शिवानंद निलावार, सचिव बालाजी कवटीकवार, कोषाध्यक्ष संदीप येरावार व वनिता क्लब अध्यक्ष छाया निलावार, सचिव सुनिता कवटीकवार, कोषाध्यक्ष कोमल येरावार यांनी केले आहे.