नांदेड। डाॅ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेंतर्गत विद्यार्थ्यांचे निर्माण झालेले प्रश्न तात्काळ सोडवा अन्यथा आंदोलन छेडणार असल्याचा ईशारा बहुजन युथ पॅथरचे जिल्हा प्रभारी भिमराव बुक्तरे यांनी दिला आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना अंतर्गतच्या विविध समस्या दूर करुन विद्यार्थ्यांची होत असलेली तारांबळ थांबवावी या न्यायिक मागणीसाठी समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त तेजस माळवदकर यांची आज बहुजन युथ पॅथरच्यावतिने जिल्हा प्रभारी भिमराव बुक्तरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने भेट घेऊन सविस्तर निवेदन देऊन चर्चा करण्यात आली.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेत अपात्र ठरविण्यात आलेल्या,पात्र किंवा अपात्र यादीत नाव नसलेले विद्यार्थी,थेट द्वितीय वर्षाला लाभ देता येत नाही.स्वाधार योजनेची रक्कम तात्काळ जमा करा,कमी टक्केवारी असलेल्या विद्यार्थ्याना शिष्यवृत्ती योजनाचा लाभ मिळावा त्रुटी राहिल्या, अशा विविध प्रकारच्या समस्याना तोंड द्यावे लागत आहे.त्यामुळे गरीब,होतकरू विद्यार्थी शिक्षणापासून शिष्यवृत्ती न मिळाल्यामुळे वंचित राहू शकतात करिता आपण विषयावर तात्काळ कारवाई करून विद्यार्थ्याना न्याय मिळवून द्यावा अशीही विनंती समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त तेजस माळवदकर यांना देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली. या प्रकरणात तात्काळ न्याय न मिळाल्यास सर्व विद्यार्थ्यांना सोबत घेवून आपल्या कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करावे लागेल असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.
बहुजन युथ पँथर चे जिल्हा प्रभारी भिमराव बुक्तरे, सामाजिक कार्यकर्ते विकास राठोड पोमनाळकर,श्रावण पवार,गौरव बुक्तरे,नागेश लोकडे,नंदपाल सावंत, बाबासाहेब निवडंगे,राष्ट्रपाल सावंत,रौनक लोकडे,शंतनु वैद्य आदींच्या या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.