नांदड। मुखेड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष, कार्याध्यक्ष, सर्व सेलचे पदाधिकारी यांची महत्वपूर्ण बैठक मुखेड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष शिवाजी नागोराव जाधव उमरदरीकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून पक्ष निरीक्षक गजाननराव पांपटवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
या प्रसंगी शिवाजीराव जाधव म्हणाले की नजीकच्या काळात मुखेड नगरपरिषद निवडणुका होत असल्याने या निवडणुकांसाठी तालुक्यातील व शहरातील पदाधिकार्यांनी तसेच कार्यकर्त्यांनी सज्ज रहावे व मुखेड शहर नगरपरिषद संदर्भात व्ह्यूव रचना आखून या वेळी नगरपरिषदेवर राष्ट्रवादी चा झेंडा फडकवावा असा निर्धार कार्यकर्त्यांनी करावा असे आव्हान केले. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुखेड पक्ष निरीक्षक गजानन पांपटवार यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना निवडणुकीच्या दृष्टीकोनातून पक्षबांधणी अधिक सक्षम करावे असे प्रतिपादन करून सखोल मर्गदर्शन केले.
या बैठकीचे सूत्रसंचालन शहर कार्याध्यक्ष जयभीम सोनकांबळे यांनी केले.यावेळी मुखेड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते अशोकसेठ मुक्कावार, मुखेड शहर अध्यक्ष सुनील मुक्कावार, रा.यु.कॉ.जिल्हा कार्याध्यक्ष संभाजी मुकनर, नांदेड रा.कॉ.सो.मी.जि. अध्यक्ष शेख शादुल(होनवडजकर) ,सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा अध्यक्ष कपील जुनेकर, शहर कार्याध्यक्ष जयभीम सोनकांबळे, प्रदेश प्रतिनिधी कैलास मादसवाड,अँड.लक्ष्मण सोमवारे, युवक अध्यक्ष रमाकांत पाटील, मुखेड विधानसभा अध्यक्ष बालाजी चापेकर,युवक शहर अध्यक्ष सचिन (बबलू) देवकते, दिनेश पाटील केरूरकर, अशोक बचेवार, युवराज चव्हाण बाबा मणियार, निशिकांत पाटील,नागनाथ गायकवाड, येलुरे पाटील, आनंदा शिंपाळे, शिंदे पाटील यांच्या सह मुखेड शहर, तालुक्यातील कार्येकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.