हदगाव| तालुक्यातील वाळकी (खुर्द)या गावाचे पुरात अडकलेल्या दोन व्यक्तिना स्थानिक प्रशासनाच्या मदतीने बुधवारी काढण्यात यश आले आहे.
तालुक्यात पावसाने थैमान माडले असुन कयादु व पेनगंगा नदीच्या पुराची पाहणी करुन उपविभागीय अधिकारी ब्रिजेश पाटील हदगाव तालुक्याचे तहसिलदार जिवराज डापकर यांनी कयाधू पेनगंगा नदीवरील व नाल्याची पुराची पाहणी करुन तेथील नदी व नाल्याकाठच्या गावच्या नागरिकांना शेतक-याना सतर्क राहण्याच्या सुचना देवून पुरामुळे हदगाव शहर निकटच्या राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या गोजेगाव व येथुन विदर्भात उमरखेडकडे जाणा-या राष्ट्रीय महामार्ग पेनगंगा नदीवरिल पुलावरुन पुराचे पाणी वाहत असल्याने वाहतुकी बाबतीत योग्य त्या सुचना हदगाव पोलिस प्रशासनला देण्यात आली आहेत.
माञ या बाबतीत माञ पोलिस प्रशासनाकडुन या बाबतीत काय नियोजन करण्यात आले याची माहीती मिळु शकलेली नाही. उपविभागीय आधिकारी व हदगाव तालुक्याचे तहसिलदार यांनी तालुक्यातील सर्व प्रशासकीय कार्यालय व नैसर्गिक आपत्तीच्या अनुषंगाने नियुक्त संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना मुख्यालयी हजर राहण्यासाठी सक्त ताकीद सुचना देण्यात आल्याचे आपत्ती विभागाकडुन सांगण्यात आले.
नुकतीच हाती आलेल्या माहीतीनुसार हदगाव तालुक्यातील उमरी (दर्याबाई)येथील संभाजी दत्ता अनेबोईनवाड ( वय24) हा दि 13 जुलै 2022 रोजी दु.1वाजेच्या दरम्यान हे शेतातुन येतांना समोरच्या नाल्यात पुरात पोहत गेलेले असुन, त्यांचा शोध अध्याप ही लागलेला नाही. अशी माहीती डोरली या गावच्या सज्जाचे तलाठी यांनी हदगाव यांना एका पञाद्वरे कळविले आहे.