सहायक जिल्हाधिकारी सौ.सोम्या शर्मा तहसीलदारांना घेऊन पोहचले थेट बांधावर -NNL

मुखेड तालुक्यातील पुरपरिस्थीती व शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पाहणी करून तालुका प्रशासनाला सतर्क राहाण्याचे आदेश दिले

शेतकऱ्यांच्या नुकसानीचे प्रस्तुत अहवाल सादर करण्याचे तलाठ्यांना निर्देश दिले


मुखेड, रणजित जामखेडकर|
मुखेड तालुक्यात मागील तीन -चार दिवसांपासून संततधार पावसामुळे अतिवृष्टी नदीतील पाण्याचा पातळीत वाढ होऊन पूरपरिस्थिती निर्माण झाली असून हजारों हेक्टर जमीन पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचा पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.

या नुकसानीची व पूर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी सहाय्यक जिल्हाधिकारी सौ.सोम्या शर्मा व तहसीलदार काशिनाथ पाटील यांना सोबत घेऊन शिरुर(दबडे),सोनपेठवाडी, कुंद्राळा प्रकल्प हे पुर्ण क्षमतेने भरल्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला.मुखेड शहरांसहअनेक गावाना प्रत्यक्ष भेट घेऊन सुचना दिल्या आहेत.मुखेड तालुक्यातील प्रत्येक गावाच्या तलाठ्यांना नुकसानीचा प्रस्तुत अहवाल देण्याचे आदेश दिला आहे.

मुखेड तालुक्यातील आतापर्यंत कुठेही काही घटना घडली नाही.प्रशासन पुर्ण बाबींवर लक्ष ठेवून गाव भेटी करत आहे. यात नायब तहसीलदार महेश हांडे, तलाठी गोपिनाथ कल्याणकर,उदय मिसाळे,गजानन पडोळे, ज्ञानेश्वर रातोळीकर,लक्ष्मण गोधणे,प्रविण पवार,रवि कापसे,सतिश देशमुख, एम.जी. जमदाडे, प्रकाश तोटेवाड, एम.बी. श्रीरामे,बळी कदम, उषा देवतळे, एस.एम.कोनाळे,जगन्नाथ वारकरी, एन.एस. भिसे, गंगाधर मेहत्रे, देविदास भुरेवार,एस.डी.लोकरे,आनंद करडे व मंडळ अधिकारी यल्लावार हे सहाय्यक जिल्हाधिकारी सौ.सौम्या शर्मा व तहसीलदार काशिनाथ पाटील यांच्या सोबत कर्तव्यावर दक्ष आहेत.

सहायक जिल्हाधिकारी सौ.शर्मा यांनी आज मुखेड तालुक्यातील मौजे सलगरा (खु), सलगरा (बु),बेटमोगरा मुखेड शहर ,उच्चा,शिरुर दबडे, सोनपेठवाडी,कुंद्राळा भेट दिल्या नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन कक्षात पेशकार गुलाब शेख हे कार्यरत आहेत. नदीकाठच्या गावांना भेट देवून पूर परिस्थितीच्या आढावा घेतला. तसेच गावातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी राहण्याचा सल्ला देऊन नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी