तेरा दिवसाचा खडतर प्रवास करून अमरनाथ, वैष्णोदेवी व अमृतसर दर्शन घेऊन भाविक परतले -NNL


नांदेड|
तेरा दिवसाचा खडतर प्रवास करून अमरनाथ, वैष्णोदेवी व अमृतसर दर्शन घेतलेले धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली गेलेला १०५ यात्रेकरूंचा पहिला जत्था बुधवारी रात्री नांदेडला सुखरूप पोहोचला असून  भर पावसात  नांदेड रेल्वे स्थानकावर मोठ्या संख्येने जमा झालेल्या मित्र व नातेवाईकांनी जल्लोषात स्वागत केले.

योग्य नियोजन, राहण्याची व प्रवासाची उत्तम व्यवस्था, भरपूर मनोरंजन तसेच दिलीप ठाकूर यांच्या मित्र मंडळाकडून जागोजागी मिळालेले चविष्ट भोजन यामुळे एकोणविसावी अमरनाथ यात्रा संस्मरणीय झाली. विविध खेळ आणि स्पर्धा यातून यशस्वी ठरलेल्या  यात्रेकरूंना वेगवेगळे विशेषण देऊन स्मृतीचिन्ह प्रदान करण्यात आले. त्यामध्ये बेस्ट टूरिस्ट मेल  सतीश शर्मा,बेस्ट टुरिस्ट फीमेल अर्पिता नेरलकर,बेस्ट कपल संध्या व सुधीर विष्णूपुरीकर,बेस्ट फॅमिली नेरलकर फॅमिली,परफेक्ट कपल अंजली व आत्माराम पळणीटकर ,मेड फॉर इच अदर सुमित्रा व नंदकुमार मेगदे, ऑल वेज फ्रेश कपल भारती व घनश्याम शर्मा,ध्येयवादी जोडी विजया व विलास आराध्ये, जॉली कपल सुलभा व विनोद कापशीकर,जोडी कमाल की सविता व अरुण काबरा,आदर्श जोडी मदनेश्वरी व सुभाष देवकते, समाधानी जोडी संध्या व धोंडोपंत पोपशेठवार,आनंदी जोडी मंगल व रत्नाकर केसकर,एक दुजे के लिए वैशाली व पांडुरंग चंबलवार,


डॅशिंग कपल मेघा व दत्तात्रय कोळेकर, फेविकॉल का जोड अनुराधा व संजय बच्चुवार,सज्जन जोडी जोश्ना व सुभाष भाले,आयडियल कपल सौजन्या व सदाशिव देबडवार,धार्मिक जोडी संतोषी व अशोक काप्रतवार, सुस्वाभावी जोडी मीनाक्षी व गंगाधर काप्रतवार ,सज्जन जोडी चंद्रकला व धोंडीबा भाडेकर, निगर्वी जोडी सुमन व केशवराव महाजन, सुशील जोडी ममता व अशोक शेंद्रे,हसमुख जोडी प्रीती व रामकिशन सोनटक्के, सदाबहार जोडी सुनीता व श्रीनिवास दायमा, लवली कपल चंदा व सत्यनारायण दायमा,अंडरस्टँडिंग कपल  लक्ष्मी व सत्यनारायण दायमा ,डिसेंट कपल  रेणुका व श्रीनिवास,चार्मिंग कपल कृष्णावेणी व संदीप,हीर रांझा श्यामा व शिवाजी मोरे,गुणी जोडी वर्षा व ओमकार बंगरवार ,गुणी जोडपे लता व हरिहर नारलावार, निर्मळ जोडी लक्ष्मी व गोपाळ सोमवंशी, सीता और गीता- आशालता स्वामी व उमा सोमवंशी भाई हो तो ऐसे किरण व प्रभाकर बेले यांचा समावेश होता. 

याशिवाय काही वैयक्तिक टायटल देखील देण्यात आले.बडे दिलवाला दीपकसिंह गौर, सायलेंट लेडी गीता राजपूत,फॅशन आयकॉन भारती नेरलकर, भजनसम्राज्ञी अनिता नेरलकर,मिसेस कॉन्फिडंट शरयू नेरलकर, ब्रिलियंट रूपाली देशमुख, चुलबुली अश्विनी भार्गव,अन्नपूर्णा प्रिया उन्हाळे ,सिधी साधी मीनाक्षी पुजारी,हसता हुआ नूरानी चेहरा संजीवनी वाघमारे,जिगरबाज के.आनंद,बेस्ट सिंगर पी. अनिमेश, ऑल राऊंडर  मनस्विनी ,डॅशिंग वाल्मीक पवार,आदर्श श्रीपत माने ,संयमी  प्रतिभा नेरलकर, ध्येयवादी भाऊसाहेब कदम,अभ्यासू चिंतामण जाधव,मीस क्युटी श्रेणीका बच्चुवार,सेवाभावी आनंद काप्रतवार,डिसेंट टी. लता,जेंटलमन के.शोभनराव,

क्लेवर जी .चंद्रशेखर,सेंसेशनल एम.राजेंद्रराव, मेमोरीबल जे .व्यंकटराव, बुलंद आवाज बालाजी सोनटक्के, मितभाषी श्रेयस बच्चुवार ,तपस्विनी शोभा जोशी, श्रावण बाळ डॉ.शुभम कोळेकर, इनोसंट अनुष्का राजपूत,हार्ड वर्कर कामाजी सरोदे , जॉली बिना काकोडकर ,सद्गुणी सुमित्रा टाकळीकर ,सदाचारी संदीप कदम,सुस्वभावी गजानन पत्रे, हजर जवाबी विष्णू चव्हाण,ऍडजेस्टेबल सुधाकर डांगे,मनमौजी शेखर शंखतीर्थकर यांना स्मृतीचिन्ह, शाल, मोत्याची माळ देऊन गौरविण्यात आले. दिलीप ठाकूर व संदीप मैंद यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवार दि. १५ जुलै रोजी सकाळी ११ वाजता हमसफर एक्सप्रेसने नांदेड येथून दुसरा जत्था विसाव्या अमरनाथ यात्रेसाठी रवाना होणार असल्यामुळे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी नागरिकांनी सकाळी साडेदहा वाजता नांदेड रेल्वे स्थानकावर उपस्थित रहावे असे आवाहन अमरनाथ यात्री संघातर्फे करण्यात आले आहे. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी