अमरनाथ| अतिशय सुंदर वातावरण असल्यामुळे विसाव्या अमरनाथ यात्रेतील सर्व शंभर यात्रेकरूंचे हिम शिवलिंगाचे व्यवस्थित दर्शन झाले अशी माहिती नांदेड न्यूज लाईव्हशी बोलताना दिली .
बालटाल बेस कॅम्प येथून मंगळवारी पहाटे दोन वाजता सर्व यात्रेकरूंनी स्नान करून १४ किलोमीटर अंतर पूर्ण करण्यासाठी कूच केले.३६ यात्रेकरू पालखीत तर ६३ यात्रेकरू घोड्यावरून आणि एका यात्रेकरूंने पायी जाऊन दर्शन घेतले. निरभ्र आकाश असल्यामुळे सकाळी सात वाजेपर्यंत सर्वजण पवित्र गुफे जवळ पोहोचले. दोन तासात दर्शन घेऊन परत १४ किलोमीटर अंतर खाली उतरण्यास सुरुवात केली. दुपारी बारा ते पाचच्या दरम्यान सर्वजण सुखरूपपणे बालटाल बेस कॅम्पवर परतले.
संदीप मैंद, विशाल मुळे संजय राठोड ,लक्ष्मीकांत जोगदंड हे स्वतः सर्व व्यवस्थेवर लक्ष ठेवून आहेत. याशिवाय मंगेश घोलप यांची कोकणातील केटरिंग टीमचे आठ सदस्य महाराष्ट्रीयन भोजन देत असल्यामुळे सर्वजण आनंदित आहेत. दोन दिवस श्रीनगर, गुलमार्ग येथील प्रेक्षणीय स्थळांना भेट देऊन वैष्णोदेवी व अमृतसरचे दर्शन सर्वजण घेणार आहेत. अमरनाथ दर्शनाच्या वेळी अनेकांनी मोबाईल द्वारे प्रकृतीची चौकशी केल्याबद्दल दिलीप ठाकूर यांनी सर्वांचे धन्यवाद व्यक्त केले आहे.