सर्व सामान्य रयतेचे राज्य आल्यामुळे "रयत क्रांती" ने केले उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे अभिनंदन
नांदेड/मुंबई| आज रयत क्रांती संघटना कोअर कमिटी तर्फे नवनिर्वाचित महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणीस साहेब यांना भेटून तमाम कष्टकरी शेतकऱ्यांच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले व संघटनेच्या वतीने खालील मागण्यांचे निवेदन सादर केले.
१) आपलं सरकार असताना बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांना मताचा अधिकार देण्यात आला होता. परंतु तो अधिकार महाविकास आघाडी सरकारने काढून घेतला. तरी शेतकऱ्याला बाजार समितीमध्ये पुन्हा मताचा अधिकार देण्याचा निर्णय आपण घ्यावा, ही विनंती.
२) ज्या शेतकऱ्यांना महापुरामध्ये कर्जमाफीचा लाभ मिळालेला होता व जे शेतकरी मयत झालेले आहेत. त्यांना महात्मा फुले कर्जमाफी योजनेमध्ये कर्जमाफीचा लाभ न मिळणे बाबतचा निर्णय आघाडीने सरकारने घेतला होता व त्यामध्ये जाचक अटी शर्ती घातल्यामुळे त्यापासून शेतकरी वंचित राहत आहे. त्यामुळे तो शासन निर्णय रद्द करण्यात यावा. 2019 च्या महापुरामध्ये जरी शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळाला असेल तरी नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांचा लाभ देण्यात यावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. याबाबत आपण सकारात्मक निर्णय घ्यावा.
३) शेतकऱ्यांच्या शेतीपंपाच्या अवास्तव वाढीव वीज भार (5Hpअसताना बिलात 7.5Hp वाढ करणे) बिलाबाबत आढावा घेऊन दुरुस्तीची बिले देणेबाबत निर्णय द्यावा.4) कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कायमस्वरूपी न्याय देणेकरिता निश्चित निर्यात धोरण ठरवण्यासाठी व हमीभाव मिळण्यासाठी योग्य तो निर्णय घ्यावा तसेच नाशिक येथे "कांदा हब" करण्यात यावे. ५) आपल्या सरकारमधील पूर्वीची "जलयुक्त शिवार योजना" पुन्हा सुरू करण्यात यावी.
६) महाविकास आघाडी सरकारने ऊसाची FRP दोन टप्प्यात देण्याचा निर्णय घेतला होता. तो निर्णय निर्णय रद्द करून उसाची FRP एकरकमी देण्यात यावी. यावेळी मा. दिपक पगार, प्रदेशाध्यक्ष रयत क्रांती संघटना, मा. सौ. निताताई खोत, प्रदेशाध्यक्ष, महीला आघाडी रयत क्रांती संघटना, मा. शिवनाथ जाधव, अध्यक्ष कोअर कमिटी, प्रवक्ते मा. जितु अडेलकर,मा.पांडुरंग शिंदे,प्रदेशाध्यक्ष युवा, मा. भानुदास शिंदे, प्रदेशाध्यक्ष रयत क्रांती पक्ष,मा. दिपक भोसले, कार्यकारी अध्यक्ष, मा. प्रा.सुहास पाटील, इत्यादी उपस्थित होते.