नांदेड| नांदेड जिल्ह्यातील तमाम पद्मशाली समाजातील विद्यार्थी व पालकांना आवाहन करण्यात येते की, मराठवाडा पद्मशाली महासभा अंतर्गत नांदेड जिल्हा पद्मशाली युवक संघटनेच्या वतीने दरवर्षी सामाजिक उपक्रम राबविले जातात. यावर्षी गुणवंत विद्यार्थी, नवनियुक्त पदाधिकारी यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन दि.२४ जुलै रोज रविवारी कुसुम सभागृह नांदेड येथे स.११ वा केले आहे.
पद्मशाली समाज पाऊल पडते पुढे पुढे या म्हणी प्रमाणे पद्मशाली समाजाची दैदीप्यमान प्रगती होतांना दिसून येते आहे. पद्मशाली समाजाचे गुणवंत, ज्ञानवंत, किर्तीवंत, कष्टकरी विद्यार्थी प्रचंड अभ्यासाच्या मेहनतीने उंच उंच गरुड झेप घेत आहेत ती अभिमानाची गोष्ट आहे. त्यात लातूर जिल्ह्यातील अगदी गरीब व लहान कुटुंबातील माननीय रामेश्वर सुधाकरराव सब्बनवाड आयएएस यांनी हे प्रचंड अभ्यासाच्या मेहनतीने चक्क जिल्हाधिकारी पदापर्यंत पोहोचले आहेत. तसेच नांदेड जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रात उच्च पदावर गेले आहेत आणि दहावी व बारावी परीक्षेत घवघवीत यश संपादन करून आपली सिद्धता समोर आणली आहे. तसेच नुकत्याच झालेल्या अखिल भारतीय पद्मशाली संघमच्या निवडणुकीत माननीय श्री.कंदकूटला स्वामी साहेब हैद्राबाद यांची प्रचंड मतांनी निवड झाली आहे.
या सर्व गुणवंताचा, अधिकारी, पदाधिकारी यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव व्हावा व त्यांची प्रेरणा इतरांना मिळावी या उद्देशाने नांदेड जिल्हा पद्मशाली युवक संघटने सर्व पदाधिकारी यांच्या वतीने रविवार दिनांक २४ जुलै २०२२ रोजी सकाळी ११ वाजता कुसुम सभागृह नांदेड येथे सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे. पद्मशाली समाजातील एमबीबीएस प्रवेश पात्र विध्यार्थी तसेच दहावी,बारावी मध्ये ७५ टक्केच्या वर मार्क संपादन केलेल्या विद्यार्थ्यांनी गुणपत्रिकेची छायाकिंत प्रत व पासपोर्ट साईज फोटो दोन दिनांक १५ जुलै पर्यंत आपल्या जवळच्या पुढील ठिकाणी देण्यात यावे असे आवाहन नांदेड जिल्हा पद्मशाली युवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष संग्राम निलपत्रेवार, सचिव बजरंग नागलवार , प्रसिद्धी प्रमुख सत्यजीत टिप्रेसवार, मधुकर पुर्णेकर व सर्व पदाधिकारी यांनी केले आहे.
विध्यार्थी व पालकांना मार्क मेमो जमा करण्यासाठी तालुका व विभाग निहाय प्रतिनिधींचे नावे मोबाईल नंबर सहित खालील प्रमाणे देण्यात येत आहेत. नोट- कृपया व्हाट्सएप वर मार्क मेमो व फोटो पाठवू नये. प्रत्यक्षपणे स्वीकारले जातील. संग्राम निलपत्रेवार जिल्हाध्यक्ष 9272108712, बजरंग नागलवार सचिव 9767852498. (१) नांदेड दक्षिण तालुका, चौफाळा,विणकर कॉलोनी, ब्रम्हपुरी व इतर नंदकुमार गाजुलवार- 9890094699, गणेश येलेवार- 9011199924, भारत राखेवार- 9922129954, गुरुकृपा वॉटर सिरमेवार- 94221 88186, (२) सिडको, हडको, बळीरामपूर व इतर संजय टिप्रेसवार- 9975034234, भूमाजी मामीडवार- 8857968719,(३) दुधडेअरी, वसरणी,कौठा व इतर प्रल्हाद गुजरवार- 9850202378, अजय चौधरी- 8855001391,
(४) नांदेड उत्तर तालुका, दत्तनगर, विष्णुनगर, शिवाजी नगर व इतर व्यंकटेश अमृतवार- 8928770911, शारदा टेंट पुठ्ठेवार- 9823014418, गंगाधर मारावार- 73508 58835, (५) श्रीनगर, बाबानगर, शारदानगर व इतर व्यंकटराव चिलवरवार- 9922760573, प्रा.शंकरराव कुंटुरकर- 9423140937, (६) गंगाचाळ,सोमेश कॉलनी व इतर श्रीनिवास गुरम- 9623456265, नवीन पेंटा- 9922203032, (७) काबरानगर, फरांदेनगर वाडी परिसर संतोष गुम्मलवार- 7774092667, गजानन वासमवार- 9561205060, (८) तरोडा नाका, मालेगाव रोड डी मार्ट परिसर नागभूषण दुर्गम- 9850867635, (९) राजकॉर्नर, चैतन्यनगर,तरोडा व परिसर सत्यजीत टिप्रेसवार- 9423030996, शिवाजी अन्नमवार- 8208313410, (१०) देगलूर तालुका सतीश दोमलवार- 8888147380, (११) मुखेड तालुका
नितीन चातरवार- 8149664000, सचिन रामदिनवार- 9881415084, (१२) नायगाव तालुका कैलास रामदिनवार- 9421767743, मोहन जोगेवार- 99758 16991, प्रभाकर लखपत्रेवार- 9175631990, (१३) बिलोली तालुका बलराज बाबळीकर- 9518389284, (१४) भोकर तालुका साईनाथ नरतावार- 9421759574, किनी- नागनाथ लोलपवाड- 9420671287, सोनारी- महेश दोमलवार- 8805428466, (१५) हिमायतनगर तालुका ओम रामदिनवार- 9623997921, पलीकोंडवार- 7875451758, (१६) किनवट तालुका महेश म्याकलवार- 89837 61599, (१७) धर्माबाद तालुका नरेश शिलारवार- 9763879296, नागोराव येवतीकर- 9423625769, राम चिलकेवार- 7588582805,
(१८) उमरी तालुका महेश टिप्रेसवार- 9881237115, (१९) मुदखेड तालुका किशोर मेकेवार- 8830378979, (२०) लोहा तालुका बालाजी इरमलवार-98605 49581, (२१) कंधार तालुका गजानन बोडेवार-70839 97282, वरील प्रमाणे प्रतिनिधी कडे मार्क मेमोची छायाकिंत प्रत व पासपोर्ट साईज फोटो दोन दि. १५ जुलै पर्यंत जमा करावे व मार्क मेमो प्रतवर विद्यार्थी किंवा पालक यांचा मोबाईल नंबर लिहावा व कार्यक्रमाला पद्मशाली समाज बंधू व भगिनींनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे अशी विनंती नांदेड जिल्हा पद्मशाली युवक संघटनेच्या सर्व पदाधिकारी यांच्या तर्फे करण्यात येत आहे.