खडतर असलेली अमरनाथ यात्रा सुखरूप पार पडावी यासाठी चार महिने चालण्याची व प्राणायामची पूर्वतयारी फक्त नांदेड मध्येच घेण्यात येते. त्याचा फायदा यात्रेकरूंना झाल्यामुळे प्रतिकूल परिस्थितीतही सर्वजण तंदुरुस्त आहेत. अमरनाथ ला पाऊस सुरू असल्यामुळे यात्रा बंद होती. दोन दिवस उशिरा नांदेडच्या यात्रेकरूंचे व्यवस्थित दर्शन झाले. आणखी एक दिवस उशीर झाला असता तर ढगफुटीमध्ये यात्रेकरू अडकले असते.
वैष्णोदेवी येथे सुद्धा दिवसभर प्रचंड धुके पसरले होते. १०५ यात्रेकरू पैकी ५२ यात्रेकरूंनी ढोल ताश्यांच्या गजरात १४ किलोमीटर अंतर पायी जाऊन वैष्णोदेवीचे दर्शन घेतले. १८ यात्रेकरूंनी डोली चा वापर केला तर ३५ भाविकांनी घोड्यावर बसून यात्रा पूर्ण केली. रविवारी आषाढी एकादशी निमित्य सर्व यात्रेकरू जम्मू येथील रघुनाथ मंदिराचे दर्शन करून अमृतसर येथे मुक्काम करणार आहेत. सोमवारी सुवर्ण मंदिरात मत्था टेकून अटारी वाघा बॉर्डर ला भेट देणार आहेत.
यात्रेकरूंना प्रत्येकी एक वेळेसचे भोजन खा. प्रतापराव पाटील चिखलीकर, संभाजीनगर अमरनाथ यात्री ग्रुप, नवनाथ सोनवणे उदगीर, नागेश शेट्टी,हृदयनाथ सोनवणे, मनोज शर्मा नागपुर, प्रदीप शुक्ला भोपाळ, बापू महाजन भुसावळ,कवि प्रताप फौजदार दिल्ली, चंद्रकांत गंजेवार, सरदार सुदीपसिंघ अमृतसर, सुभाष बंग, ज्ञानोबा जोगदंड जम्मू, घनश्याम शर्मा, सुप्रिया रितेश चव्हाण जालना, सतीश सुगनचंदजी शर्मा यांच्या तर्फे देण्यात आले. जगन्नाथ सोनवणे, डॉ. अजयसिंग ठाकूर पूर्णा,स्नेहलता जैस्वाल हैदराबाद,स्वाती कुलकर्णी,धोंडोपंत पोपशेटवार, राजेश डुलगच संभाजीनगर यांनी एक वेळचा अल्पोहार दिला.१३ जुलै रोजी रात्री साडेनऊ वाजता श्री गंगानगर एक्सप्रेस ने सर्व यात्रेकरूंचे नांदेड रेल्वे स्थानकावर आगमन होणार असल्याची माहिती दिलीप ठाकूर यांनी दिली आहे.