मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन केली मागणी
मुंबई/हदगाव/हिमायतनगर| नांदेड जिल्ह्यातील हदगाव-हिमायतनगर मतदारसंघात गेल्या आठ दिवसापासून सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या जमिनी पिकासह खरडून गेल्या आहेत. संततधार पावसामुळे शेती जलमय झाली असून, यंदाचा खरीप हंगाम चांगलं होईल याची अशा शेतकरी बांधवाना मावळली आहे. हि बाब लक्षात घेता तत्काळ शेती पिकाचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत देऊन उभारी द्यावी अशी मागणी आ.माधवराव पाटील जवळगावकर यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे केली आहे.
गेल्या आठ दिवसापासून सुरु असलेल्या सततच्या पावसामुळे हदगाव-हिमायतनगर तालुक्यात अतिवृष्टी झ़ाली आहे. यामुळे प्रत्येक खेड्या पाडयात वाडी अंड्याच्या प्रुस्रात असलेलं तलाव, नाले, नद्या, ओढे पुराच्या पाण्याने तुडुंब भरून वाहत आहेत. तसेच विदर्भ - मराठवाडा सीमेवरून वाहणारी पैनगंगा नदी दुथडी भरून वाहत असल्याने धोक्याची पातळी ओलांडत आहे. यामुळे अनेक गावालगत पाणी आले असून, बहुतांश गावाला पुराचा वेढा पडला असल्याने ग्रामदिन भागातील नागरिकांना धोका निर्माण झाला आहे. यामुळे अनेकांच्या घरात पाणी शिरले असून, मातीच्या घरची मोठ्या प्रमाणात पडझड होते आहे. परिणामी अनेकांना रात्र जागून काढावी लागत असून, विविध गावांचा समपार्क तुटलेला आहे.
त्यामुळे दळणवळणाचा प्रश्न निर्माण झाला असून, रस्ते ठाकठिकाणी खचल्याने शेतकर्यांना जनावरांना चार - पाणी देण्यासाठी जीव धोक्यात घालूंन ये - जा करावी लागत आहे. हिमायतनगर तालुक्यातील नदी नाले प्रचंड वाहू लागल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला असुन नागरीकांना बाहेर पडणे कठीण झाले आहे. पुराचे पाणी रान शिवारात साचून राहिल्याने आणि पावसाची रिपरिप सुरु असल्याने शेतकऱ्यांचे पेरलेले कोवळी पिके सोयाबीन, कापूस, ज्वारी, तूर, हाळद, यासह सर्वच पिके उन्मळून गेली आहेत. परिसरातील हजारो हेक्टरमध्ये पाणीच पाणी झाल्याने शेतकऱ्यांनी यंदाच्या खरेप हंगामाची आशा सोडली आहे. यापूर्वी आमचं भागातील अनेक शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केली, ती सुद्धा नुकसानीत आल्याने हदगाव-हिमायतनगर मतदार संघातील शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे सरसकट पंचनामे करून तातडीने आर्थिक मदत देण्यात यावी. अशी मागणी मुंबई मंत्रालयात जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आ.माधवराव पाटील जवळगावकर यांनी केली आहे.
मुख्यमंत्र्यांनी आ. जवळगावकरांच्या मागणीची तात्काळ दखल घेत थेट नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर यांना दूरध्वनीवरून संपर्क करून तात्काळ पंचनामे करून त्या संबंधीचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाची मदत मिळण्याची आशा लागली आहे.
सध्या पावसाचा जोर वाढतो आहे, इसापूर धरणात पाणी पातळी येते आहे. हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार पाऊस सुरु असल्याने नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत. नागरिक, शेतकरी व मजुरदारानी खबरदारी घेऊन बाहेर पडावे. शक्यतोवर पुराच्या पाण्यातून जाणायचा प्रयत्न करू नये असे आवाहन आ.माधवराव पाटील जवळगावकर यांनी मतदार संघातील सर्व मायबाप जनतेला नांदेड न्यूज लाईव्हच्या माध्यमातून केलं आहे.