विठ्ठल विठ्ठल नामाच्या जयघोषाने परीसर दुमदुमला
नांदेड। आषाढी एकादशी निमित्ताने दि. १० जुलै रोजी हडको छत्रपती शिवाजी महाराज चौक परीसरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात सकाळी ६ वाजल्यापासून दर्शनासाठी गर्दी पाहायला मिळाली.
सकाळी ९ वाजता विठ्ठल मंदिर संस्थानचे अध्यक्ष शिवाजी पाटील घोगरे, भाजयुमो जिल्हाध्यक्ष संजय पाटील घोगरे, सामाजिक कार्यकर्ते योगेश सोमाणी यांच्या वतीने विधीवत पुजा करण्यात आली. त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते सोमाणी यांच्या वतीने भाविकांनी उसळ वाटप करण्यात आले.
यावेळी संजय घोगरे, योगेश सोमाणी, गजानन कत्ते, मंगेश कदम, संतोष गुट्टे, शिवाजी हंबर्ड, आशिष मालपाणी, उमेश स्वामी, किरण कापसे, अरविंद ताटे, दिगंबर शिंदे, महेश वल्लावार, अविनाश कांबळे , संग्राम मोरे, बाळु एकलारे, मुन्ना शिंदे, तक्ष घोगरे, पिंटु एकलारे समवेत योगेश सोमाणी मित्र परीवाराचे कार्यकर्ते यांनी उसळ व केळी वाटप करण्यासाठी परीश्रम घेतले.