मुसळधार पावसामुळे हिमायतनगर तालुक्यातील वडगांव ज गावाचा दोन दिवसांपासून संपर्क तुटला -NNL

दळणवळनाचा प्रश्न ऐरणीवर, पुलाची उंची वाढऊन तलावातील गाळ काढणे गरजेचे


हिमायतनगर,अनिल मादसवार।
गेल्या 4 दिवसापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे तालुक्यातील मौजे वडगाव ज येथील पुलावरून पाणी वाहू लागल्याने दोन दिवसांपासून येथील गावकऱ्यांचा संपर्क तुटला आहे, त्यामुळे दळणवळनाचा प्रश्न निर्माण झाला असून, आजारी रुग्णांना रुग्णालयात नेताना रेल्वे पटरीच्या मार्गाने हिमायतनगर गाठावे लागले असल्याची प्रतिक्रिया गावकऱ्यांनी दिली. गेल्या अनेक वर्षांपासून येथील पुलाची उंची वाढऊन तलावातील गाळ काढण्यात यावा अशी मागणी केली जात असताना याकडे सर्वच राजकीय नेत्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतो आहे.

हिमायतनगर तालुक्यात गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आदिवासी पट्ट्यात असलेला गणेशवाडी, गणेशवाडी तांडा, सवना ज, पिछोण्डी, वडगाव बसस्टोप, वडगाव ज, वडगाव तांडा, बुरकुलवाडी, खैरगाव, खैरगाव तांडा १, २  व ३, वाळकी, वाळकी तांडा, या गावांत व परिसरात सततच्या पावसामुळे नाले तुडूंब भरून वाहत आहेत, यामुळं जिकडे तिकडे पाणीच पाणी झालं असून, वडगाव जवळील पुलावरून पाणी वाहत असल्याने दोन दिवसापासून वडगाव ज चा संपर्क तुटला आहे.

वरील गावच्या पिण्याच्या पाण्याची व सिंचनाची भिस्त असलेल्या वडगाव जवळील सुना तलाव तुडूंब भरला असून, ओव्हरफलो झाल्याने गावं परिसराला पुराच्या पाण्यामुळे वेढा बसला आहे. या सुना प्रकल्पातील सांडवा २०२ मीटर असून,त्याची उंची १ मीटरने वाढविणे यासाठी शासनाची सीमारेषा आणखी शिल्लक आहे. तलावाला दोन कैनॉल असून, उजवा कैनॉल १२ किलो मीटरचा तर डावा कालवा ६  किलो मीटरचा आहे. तसेच तलावाची पाळू २८४० मीटर आहे आजघडीला या तलावात झाडे झुडपे वाढली असून, गाळ साचला असल्याने कैनॉल दुरुस्ती झाली नसल्याने व्यवस्थावपण बिघडून पाऊस जास्त झाला की, तलाव ओव्हरफलो होऊन गावच्या मार्ग बंद पडतो आहे. 


सुना तालावच्या सांडव्यातून येणाऱ्या पाण्यामूळ वडगावकडे जाणाऱ्या नाल्याच्या पूल लहान असल्याने मुसळधार पावसाचा पूर नाल्याच्या वरून वाहू लागल्यानं गावाचा संपर्क 2 दिवसापासून तुटला आहे. त्यामुळे येथील डायलिसिस च्या रूग्णाला रेल्वे पटरीच्या मार्गाने नेण्याची वेळ गावकाऱ्यावर आली होती. मागील काळात या पुलाच्या पुरात वाहून दोघा जणांचा बळी गेला आहे, तर गतवर्षी आलेल्या पुरात एक ऑटो वाहून गेला होता, सुदैवाने सर्वजण सुखरूप बचावले आहेत. अश्या घटना पुन्हा होऊ नयेत म्हणून येथील पुलाची उंची वाढऊन तलावाच्या आतील गाळ काढून उंची वाढवावी अशी मागणी केली जात आहे.

यासाठी सण २०१० पासून गावकऱ्यांनी अनेकदा आमदार, खासदारापर्यंत निवेदने दिली. मात्र गावकऱ्यांच्या पदरी आजपर्यंत निराशाच आली आहे. गावाचा समावेश पाणलोट क्षेत्रात असून, सुद्धा गावचा आणि परिसराचा विकास होत नसल्याने गावकऱ्यातून खेद व्यक्त केला जात आहे. दोन दिवसांपासून गावाचा संपर्क तुटल्यामुळे सुना तलावाची उंची १ मीटरने वाढवावी, पूर्व पश्चिमेला गेटयुक्त बंधारा व्हावा, गावालगत असलेल्या पूलाची उंची वाढवावी, गावालगतच्या पाषाण असलेल्या घाटावर पायऱ्या बांधण्यात याव्यात. शेतकऱ्यांना बारमाही पाणी उपलब्ध करून देणे तसेच नाल्यावर गेटयुक्त कोल्हापुरी बंधारे बांधणे, तलावातील गाळ काढून उजवा कालवा १२ किलोमीटर आणि डावा कालवा ६ किमी असलेल्या भागाची दुरुस्ती करून वडगावसह तलावावर अवलंबून असलेल्या सर्व गावांना पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळावे. आणि दरवर्षी पावसाळ्यात पुरामुळे बंद पडणाऱ्या मार्गापासून सुटका करावी अशी मागणी सरपंच विशाल राठोड, बालाजी लिंगमपल्ले, दत्तात्रेय हंगरगे, नारायण ताडकुले, रामचंद्र बिरकुरे, विठ्ठल खुणे, विठ्ठल बिरकुरे, चंपती ताडकुले, नारायण कोरेवाड, अवधूत खुणे, मनोज बिरकुरे, रामभाऊ बिरकुरे, आदींसह गावकऱ्यांनी केली आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी