नांदेड| शीख समाजातील हरजसकौरने पहिल्यांदा राष्ट्रीय विधी विद्यापीठात (Mahrashtra National Law University, MNLU) Nagpur येथे प्रवेश मिळविला आहे.या यशासाठी हरजसकौरचे सर्वत्र कौतुक होत आहे.
नांदेड शहरातील उद्योजक अमरिकसिंघ जगजीतसिंघजी रामगडिया आणि शिक्षिका आई सतबीरकौर यांची कन्या हरजसकौर यांनी बारावी परीक्षेत ८३ टक्के गुण प्राप्त करून राष्टीय स्तरातील विधी प्रवेश परीक्षेत (CLAT-2022) तयारी केली.त्यात त्याना यश प्राप्त झाले.राष्ट्रीय विधी विद्यापीठ नागपूर येथे त्यांचा प्रवेश निश्चित झाला आहे.नांदेड शीख समाजातील हरजसकौर या प्रथम कन्या आहेत ज्यांना हे यश प्राप्त झाले आहे. हरजसकौर ह्या नांदेड महानगरपालिकेतील नगरसेविका प्रकाशकौर सुरजितसिंघ खालसा यांच्या नात आहेत.
आपल्या यशानंतर हरजसकौर बोलत होत्या. श्री वाहेगुरूजी यांच्या कृपेने आणि जत्थेदारजी संतबाबा कुलवंतसिंघजी यांच्या आशीर्वादाने मला प्राप्त झालेले यश मी माझ्या आई वडिलांना समर्पित करीत आहे.आजचे माझे यश ही प्रथम पायरी आहे.मला पुढे विधी पदवी प्राप्त करून न्यायाधीश पदावर यश संपादन करण्याचे बळ मिळावे अशी माझी इच्छा आहे. सर्व रामगडिया परिवार आणि खालसा परिवारात आनंद व्यक्त होत आहे.