नांदेड| दक्षिण मध्य रेल्वेने नांदेड ते कर्नाटक राज्यातील हुबळी दरम्यान विशेष गाड्या सुरु करण्याचे ठरविले आहे. या विशेष गाडीच्या सहा फेऱ्या मंजूर करण्यात आल्या आहेत. या विशेष गाड्या नांदेड येथून दर शनिवारी दुपारी 14.10 वाजता सुटतील आणि परभणी, गंगाखेड, परळी, लातूर, कुर्डूवाडी, पंढरपूर, मिरज, लोंढा जं., धारवाड मार्गे हुबळी येथे दुसऱ्या दिवशी रविवारी सकाळी 09.00 वाजता पोहोचेल.
परतीच्या प्रवासात या विशेष गाड्या रविवारी सकाळी 11.15 वाजता सुटतील वरील मार्गाने आणि नांदेड येथे सोमवारी सकाळी 08.10 वाजता पोहोचतील. ते पुढील प्रमाणे –
1) नांदेड-हुबळी विशेष रेल्वे साप्ताहिक सेवा: गाडी क्रमांक 07635 हि गाडी दिनांक 16 जुलै, 23 जुलै आणि 30 जुलै, 2022 रोजी शनिवारी दुपारी 14.10 वाजता सुटेल आणि पूर्णा, परभणी, गंगाखेड, परळी, लातूर रोड, लातूर, उस्मानाबाद, बार्शी टाऊन, कुर्डूवाडी, पंढरपूर, सांगोला, मिरज, घाटप्रभा, बेळगावी, लोंढा जं., धारवाड मार्गे हुबळी येथे दुसऱ्या दिवशी रविवारी सकाळी 09.00 वाजता पोहोचेल.
2) हुबळी – नांदेड विशेष रेल्वे साप्ताहिक सेवा: गाडी क्रमांक 07636 हि गाडी दिनांक 17 जुलै, 24 जुलै आणि 31 जुलै, 2022 रोजी रविवारी सकाळी 11.15 वाजता सुटेल आणि आलेल्या मार्गानेच आणि नांदेड येथे सोमवारी सकाळी 08.10 वाजता पोहोचेल.
3) या गाडीत प्रथम श्रेणी वातानुकुलीत, द्वितीय श्रेणी वातानुकुलीत, तृतीय श्रेणी वातानुकूलित, स्लीपर क्लास, जनरल आणि एस.एल.आर डब्बे असतील.
नांदेड-तिरुपती दरम्यान चार विशेष गाड्या :
1) नांदेड – तिरुपती साप्ताहिक विशेष सेवा : गाडी क्रमांक 07633 हि गाडी दिनांक 16 जुलै आणि 23 जुलै, 2022 रोजी शनिवारी दुपारी 12.00 वाजता सुटेल आणि पूर्णा, परभणी, गंगाखेड, परळी, लातूर रोड, उदगीर, भालकी, बिदर, झहीराबाद, विकाराबाद, तांदूर, सेरम, चित्तापूर, सुलेहाल्ली, यादगीर, कृष्णा, रायचूर, मंत्रालयम रोड, अदोनी, गुंटकळ, गुती, तादिपात्री, येर्रागुंतला, कडप्पा, रेनिगुंता मार्गे तिरुपती येथे दुसऱ्या दिवशी रविवारी सकाळी 08.30 वाजता पोहोचेल.
2) तिरुपती-नांदेड साप्ताहिक विशेष सेवा : गाडी क्रमांक 07634 हि गाडी दिनांक 17 जुलै आणि 24 जुलै, 2022 रोजी रविवारी रात्री 21.00 वाजता सुटेल आणि आलेल्या मार्गानेच नांदेड येथे दुसऱ्या दिवशी सोमवारी सायंकाळी 17.20 वाजता सुटेल.
4) या गाडीत प्रथम श्रेणी वातानुकुलीत, द्वितीय श्रेणी वातानुकुलीत, तृतीय श्रेणी वातानुकूलित, स्लीपर क्लास, जनरल आणि एस.एल.आर डब्बे असतील.