हिमायतनगर, अनिल मादसवार| विदर्भ मराठवाड्यच्या सीमेवरून वाहणाऱ्या पैनगंगा नदीने धोक्याहची पातळी ओलांडली आहे. नदीचे पाणी पात्र सोडून बाहेर पडू लागले असून, नदीकाठावरील अनेक गावानजीक पुराचे पाणी आले आहे. त्यात तालुक्यातील घारापुरी येथील नवी अबादीत राहणाऱ्या अनेक नागरिकाच्या अनेक घरात पैनगंगेचे पाणी आले असून, येथील नागरिकांची सुरक्षा धोक्यात आहे. वरील पातळीवर झालेल्या पावसाच्या पुराचे पाणी आणि तालुका परिसरात सुरु असलेला पाऊस पाहत पाणी पातळी वाढण्याची शक्यता बळावली आहे. या बाबीकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष देऊन येथे बचाव सुरक्षा पथक पाठवावे आणि नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविणे गरजेचे आहे.