नांदेड, अनिल मादसवार| जिल्ह्यात गुरुवार दि.१४ जुलै रोजी सकाळी ८.२० वा. संपलेल्या गत २४ तासात सरासरी ६५.१० मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून, जिल्ह्यात एकुण 575.40 मिलीमीटर पाऊस झाला आहे. यात सर्वाधिक पाऊस हिमायतनगर तालुक्यात झाला आहे. यामुळे परिसरातील शेती पूर्णतः नष्ठ झाली असून, ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी जोर धरत आहे.
जिल्ह्यात गुरुवार १४ जुलै २०२२ रोजी सकाळी संपलेल्या गत २४ तासात झालेला पाऊस मिलीमीटर मध्ये तालुकानिहाय पुढील प्रमाणे, कंसात एकूण पाऊस : नांदेड- 48.20 (576.50), बिलोली-88.60 (602.40), मुखेड- 45.30(525.60), कंधार-44.50 (591.70), लोहा-43.40 (549.30), हदगाव-74.60 (534), भोकर- 109 (661.10), देगलूर-39.10 (493.80), किनवट-48.90 (552.30), मुदखेड- 107.10 (746.60), हिमायतनगर-112 (780.20), माहूर- 57.50 (482.60), धर्माबाद- 62 (572.80), उमरी- 107.90 (700.90), अर्धापूर- 78.50 (568.50), नायगाव- 83.70 (535.40) मिलीमीटर आहे.