हिमायतनगर| अर्धवट व बोगस काम तसेच अधिकारी कार्यकारी अभियंता, उपअभियंता, सहाय्यक अभियंता, येवढेच नाहीतर याबाबत अधीक्षक अभियंता यांना प्रत्यक्ष भेटून साइटवर दाखवून सुद्धा पावसाळ्यापूर्वी कोणतेही नियोजन केले नाही. त्यामुळे टेंभुर्णी - वाघी येथील कॅनालच्या कडेच्या शेतकऱ्याचे पिके पाण्यात आल्याने अतोनात नुकसान झाले आहे. या बाबत शेतकर्यांची चर्चा केली असता विलास पाटील, संतोष पाटील, रामराव देवसरकर, दत्ता पाटील, माजी सरपंच प्रल्हाद पाटील यांनी कॅनॉलच्या अधिकाऱ्यावर बेजाबदार पणा व भ्रष्टाचार केल्या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार करायचे ठरवले आहे.
हिमायतनगर तालुक्यातील जवळगाव, वाघी, विरसनि, टेंभुर्णी, या भागातून जाणारा ८५ ते ८९ की. मी. आणि टेल मायनर १ की. मी. किरमगावंचि शिव हा या गावातील शेतकर्यासाठी सदरील कैनॉल वरदान ठरायच्या ऐवजी आता शाप ठरत आहे. शेतकर्यांच्या हितासाठी बांधण्यात आलेला कॅनाल शेतकर्यांच्या जिवावर बेतला जात आहे. ज्यावेळी पाणी पाहिजे तेंव्हा पाणी मिळत नाही वेळेवर पाणी येत नाही. आलेच तर तेही लवकरच बंद केले जाते कारन पुढे जे मायनर नंबर ११०,१११,११२,११३,११४,११५, आणि ११५A यांना ट्राइलिंग केलेली नाही. म्हणजे ते काम नाल्या पर्यंत नेले नाही. तर ते काम शेतकर्यांच्या शेतात सोडून दिले आहे.
त्यामुळे पाणी आले तरी घेता येत नाही, आणि पावसाच्या पाण्याचे कोणतेही नियोजन कॅनालचे बांध काम करतांना केले गेले नाही. पावसाचे सर्व पाणी हे सहज कॅनॉल मध्ये येते आणि हे पाणी कॅनाल मध्ये सामावल जात नाही. त्यामुळे जागो जागी कॅनाल फुटून शेतकर्यांचे शेतीचे नुकसान होत आहे. हे सर्व शेतकर्यांच्या माथी मारले जाते. कारण पाऊस जास्त झाला,शेतकर्यांनी कॅनॉल मध्य पाणी काढून दिले, खेकडे, उंदराने, कॅनाल कोरले, ही कारणे सांगून पुन्हा अतिवृष्टीने नुकसान झाले म्हणुन लाखो रुपयाचे अंदाज पत्रक करून थातूरमातूर बोगस काम करून आपले पोट भरून घेण्याचे काम ठेकेदार, अधिकार, कर्मचारी मागील कित्येक वर्षा पासुन करत आहेत.
यात आमचा काहीही संबंध नाही असे पत्र शेतकर्यांना आणि वरिष्ठांना देऊन मोकळे होतात आणि शेतकरी मात्र या सर्व प्रकारात भरडला जात आहे. गतवर्षी म्हणजे जानेवारी २०२२ महिन्यात नांदेड विभागाचे अधीक्षक अभियंता यांना या सर्व बाबी निदर्शनास आणून दिल्या. पन त्याचा काहीही उपयोग झाला नाही. मागील वर्षी आणि वेळोवेळी कैनॉल फुटून जाणे ह्या घटना घडत आहेत. त्यामुळे या कामात आमदार, खासदार, पालकमंत्री अशोकराव चव्हाण, मंत्री पाटबंधारे, मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी यांनी जातीने लक्ष घालून या घटना पासुन या भागातील शेतकर्यांची सुटका करावी. जो शेतकरी आपल्या मुला बाळासाठी, रात्रंदिवस मेहनत करतो. हजारो रुपये जमिनीत टाकतो आणि अचानक त्याच्या डोळ्या समोर त्याचे पीक मानव निर्मित संकटाने उद्वस्त होते. त्याला अतिवृष्टीचे कारन देऊन सर्व काही शांत केले जात आहे. यातून काही शेतकरी सावरतात तर काही आपली जीवन यात्रा संपवतात याचा विचार केला पाहिजे अश्या संतापजनक भावना या भागातील शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत.