मंगरूळ येथील शेतकऱ्यांची गाय पुरात वाहुन मृत्यू तर 4 घरांची पडझड कुटुबिंय उघड्यावर -NNL


हिमायतनगर।
मंगरूळ येथील पुलावरून मोठ्या प्रमाणात पुर वाहत असल्यामुळे तिन दिवसापासून नागरीकांचा संपर्क तुटला आहे. गावाबाहेर निघता ऐत नसल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे तर नदीच्या थडीला गाया चरत असतांना पाण्यात आलेल्या पुरात गाय वाहुन मृत्यू झाल्याची घटना घडली तर चार पाच घरांची पडझड झाली आहे यामुळे कुटुंबिय उघड्यावर आले आहे. 

हिमायतनगर तालुक्यातील मंगरूळ येथील पुल गेल्या काही दिवसापासून खचला असुन या पुलामुळे पावसाळ्यात धोका निर्माण झाला आहे. आठ दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत. मंगरूळ पुलावरून मोठ्या प्रमाणात पुर वाहत असल्यामुळे नागरीकांना गावाबाहेर निघता जमेना झाले आहे.

बुधवारी दुपारी नदीच्या थडीला शेतकरी सुभाष जललवाड हे गाय चारत होते. अचानक पुर वाढला आणि सदरील गाय पुरात वाहुन गेल्याची घटना घडली काही अंतरावर काही तासानंतर गाय मृत्यू झाल्याच्या अवस्थेत आढळून आली आहे . तर गावातील चार पाच नागरीकांचे या पावसामुळे पडली असुन सदरील घरात राहणारे कुटुंब उघड्यावर आले आहेत. सरपंच प्रतिनिधी जिवन जैस्वाल यांनी पाहणी केली. मंगरूळ येथील पुलाची उंची वाढवून पुल बांधकाम करण्याची मागणी केली आहे.

हिमायतनगर तालुक्यातील कोठा तांडा, टाकाराळा, सीबदरा यासह हिमायतनगर शहरातील अनेक घरांची पडझड झाली आहे यामुळे अनेकांच्या संसार उघड्यावर आले असून, शासनाने घरपडी झालेल्या नागरिकांना मदतीचा हात द्यावा आणि त्यांचे संसार उभे करावे अशी मागणी केली जाते आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी