नांदेड, अनिल मादसवार| हदगाव-हिमायतनगर विधानसभा मतदार संघात झालेल्या ८ दिवसाच्या पावसामुळे अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे नदी नाले ओव्हरफ्लोव झाली असून, परिणामी बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे. तर विविध गावात पुराचे पाणी शिरल्याने अनेकांच्या घरांची पडझड झाली असून, यामुळे नागरिक व शेतकरी अडचणीत आले आहेत. या अतिवृष्टीच्या पुरामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना कोणतेही पंचनामे न करता तत्काळ सरसकट मदत मिळून देण्यात द्यावी अशी मागणी माजी आ. नागेश पाटील आष्टीकर यांनी जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांचेकडे पत्राद्वारे केली आहे.
नांदेड जिल्ह्यातील हदगाव - हिमायतनगर तालुक्यामध्ये पावसाने सरासरी गाठल्याने शेतक-यांकडील एकमेव उपजिवीकेचे साधन असलेली शेतजमीन नापिकी झाली आहे. यंदा मृग नक्षत्राच्या भरवश्यावर पेरलेली पिके पाऊस नसल्याने बहुतांश शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली होती. त्यानंतर सुरु झालेल्या पावसाने झोडपून काढल्याने शेतात पाणी साचून राहत असल्याने कोवळी पिके उन्मळून गेली आहेत. नाल्या आणि नदीच्या काठावरील शेतकऱ्यांच्या पिकांची स्थिती तर भयावर झाली आहे. यामुळे मागे आड पूढे विहीर अशी वाईट स्थिती खचलेल्या बळीराजाची झाली. या पावसामुळे पिकांची झालेली अवस्था पाहून शासनाने हिमायतनगर तालुका ओला दुष्काळ जाहीर करावा. आणि शेतीवर उपजीविका भागविणाऱ्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना या अतिवृहस्तीच्या संकटातून सावरण्याची शक्ती देणे अत्यावश्यक आहे.
सन १९८३ मध्ये खरीप पेरणी काळात ३० वर्षांअगोदर पावसाने अशा प्रकारे थैमान घातले होते. तीच परिस्थिती यंदा निर्माण होते कि काय..? अशी चिंता सर्वाना लागली आहे. सततच्या पावसामुळे शेतधूरे, कोल्हापूरी बंधारे, जाळीचे बंधारे सर्वच जादा पावसाने तूटफुटीत आले असून, नदीकठा लगतचे शेतजमिनी खरडून गेले आहे. शेतात पाणी साचल्याने तलावाचे स्वरुप आले असून, या पावसामुळे अनेक पुलावरून पाणी जात असल्याने विविध गावाचा संपर्क तुटलेला आहे. तर अनेक घरामध्ये पाणी शिरल्याने मातीच्या घरासह चांगल्या घरांची देखील पडझड झाली आहे. यामुळे जनजीवन विसकळीत झाले असून, अशी बीकट परिस्थिती हदगाव - हिमायतनगर मतदार संघाची झाली आहे. त्यामुळे नुकसानीचे पंचनामे न करता मतदार संघात ओला दुष्काळ जाहीर करून तात्काळ शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची मदत द्यायला हवी अशी प्रतिक्रिया त्यांनी नांदेड न्यूज लाईव्हशी बोलताना व्यक्त केली.
मा.आ.नागेश पाटील आष्टीकर यांच्यावतीने शिवसैनिकाना आवाहन
नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे. निसर्गच पाणी बंद होत नाही. त्यामुळे हदगाव हिमायतनगर मतदार संघात पूर आल्याने शेतकरी, व नदीनालायच्या काठावरील गावकरी हैराण झाले आहेत. सध्यां बहुतांश गावाला पुराच्या पाण्याने वेढा घातला आहे. नदीकाठच्या गावातील व आजूबाजूच्या परिसरातील सर्व शिवसैनिकानी आपल्याकडून जमेल तेवढी जास्तीत जास्त मदत पूरग्रस्त नागरिकांना करावी. शिवसेना हे पहिले पासूनच ८०% समाजकारण व २० % राजकारण करत असते. त्यामुळे सर्व शिवसैनिकानी जनतेला अडचण भासू नये यासाठी मदतीचा हात द्यावा असे आवाहन मा.आ.नागेश पाटील आष्टीकर यांनी केलं आहे.