उस्माननगर, माणिक भिसे। आगामी काळात होणाऱ्या व दिग्गज पुढाऱ्यांचे लक्ष वेधलेल्या शिराढोण जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आरक्षणाकडे भावी उमेदवारांच्या नजरा लागल्या असून अनेक कार्यकर्ते गुडख्याला बाशिंग बांधून बहूल्यावर चढण्यासाठी तयारीत असल्याने या भागाचे नेते कोणाच्या नावाची घोषणा करतील याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे.
बहुचर्चित व गेल्या अनेक दिवसापासून सर्कल व गणा मध्ये जोरदार कार्यक्रमाला हजेरी लावणारे राजकीय पुढारी तसेच नवीन उमेदवार यांच्या हालचालीला आलेला वेग व प्रत्येकाने अंदाज लावून भेटीगाठी वर दिलेला भर नवीन सर्कल कोणते होणार याची उत्सुकता अखेर मार्गी लागली. जि प व पंचायत समिती निवडणुकीची अखेर प्रभाग रचना जाहीर करण्यात आली. येणाऱ्या स्थानिक निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय होणार अशा चर्चेला उधाण आले होते.
पंचायत समिती कंधार तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीची प्रभाग रचना जाहीर करण्यात आली. यापूर्वी कंधार तालुक्यात ६ जि प गट तर १२ पंचायत समिती गण होते. निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार एक नवीन जी प गटाची भर व दोन गणाचा समावेश करण्यात आला. तर आत्ता जि प गट ७ झाले व पंचायत समिती गण १४ झाले आणि गावांमध्येही फेरबदल करण्यात आला आहे.
२०१७ मध्ये निवडणूक लढवून प्रतिनिधित्व करीत असलेले प्रतिनिधी प्रवीण पाटील चिखलीकर शिवसेना, तर उस्माननगर प.स.सदस्या सौ.लक्ष्मीबाई व्यंकटराव घोरबांड , हे उमेदवार होते. तर गेल्या अनेक दिवसापासून विद्यमान व काही नवीन उमेदवारानी आपल्या भेटीगाठी वर भर दिला आहे.
यामध्ये वेगवेगळ्या उमेदवारांच्या नावांची चर्चा ऐकावयास मिळत आहे. शिराढोण जि प साठी- काॅंग्रेस पक्षाचे प्रवक्ते संतोष पांडागळे यांचे बंधू बी.आर.पांडागळे ,माजी सभापती तथा राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष बालाजी पांडागळे, भाजपचे राष्ट्रीय सदस्य तथा माजी सरपंच तुकाराम वारकड गुरूजी,आमिनशा फकीर ,प्रविन पाटील चिखलीकर. आ.श्यामसुंदर शिंदे यांचे विश्वासू खंदे समर्थक बालाजी ईसादकर , अण्णा भाऊ साठे पिंपल्स फोर्सचे अध्यक्ष बा.रा.वाघमारे , मा. प.स.सदस्य प्रतिनिधी रशीद खान पठाण , यांच्या सह अनेक उमेदवारांची चर्चा ऐकावयास मिळत आहे.
सर्वात जास्त आपल्या भेटीगाठीवर ज्या उमेदवारानी भर दिला आहे यामध्ये . प्रवीण पाटील चिखलीकर शिराढोण मधून विद्यमान चालू सदस्य आहेत . तसेच विद्यमान कंधार लोहा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्यामसुंदर शिंदे व त्यांच्या पत्नी सामाजिक कार्यकर्त्या सौ.आशाताई शिंदे यांनी या अगोदर पक्ष मेळाव्यात आगामी निवडणुकीत सर्वच जागा लढवण्याचे जाहीर केले होते., बालाजी पांडागळे,हे गेल्या वेळेस शिराढोण सर्कल मधून थोड्या मताने पराजय झाला होता. ते सुद्धा कामाला लागले आहेत. बी.आर.पांडागळे ,रशीद पठाण, बालाजी ईसादकर ,आमिनशा फकीर , नितिन लाटकर , रामजी सोनसळे लाटकर ,हे छोट्या मोठ्या कार्यक्रमाला उपस्थिती लक्षणीय होती.
बालाजी पांडागळे गेल्या वेळेस शिराढोण मधून थोड्या मताने पराजय झाला होता. यावेळेस शिराढोन मधूनच थांबणार अशी चर्चा आहे. पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांचे विश्वासू म्हणून ओळखले जातात. कंधार कांग्रेस तालुका अध्यक्ष आहेत. काहीजणांनी भेटीगाठी बरोबरच विकास कामांनाही सुरुवात केली आहे. कोणी कोणत्या सर्कल या गणामध्ये आपले नातेवाईक आहेत यानुसार भेटीगाठी वर जोर दिला होता तर कोणी आपला समाज कुठे जास्त आहे याचे परीक्षण करून भेटीगाठी वाढविल्या आहेत. पण सगळ्या उमेदवारांच्या नजरा आरक्षण जाहीर होण्याकडे लागल्या असल्यामुळें कोण कोठून थांबणार आहे हे चित्र स्पष्ट होणार आहे.
सामाजिक कार्यकर्त्या आशाताई शिंदे यांनी या अगोदर पक्ष मेळाव्यामध्ये जिल्हा परिषदेच्या सर्वच्या सर्व जागा लढवण्याचे जाहीर केले होते. पण येणारी विधानसभा लढवणार अशीही चर्चा चालू आहे.
उस्माननगर येथील ग्रामपंचायत निवडणूक अटीतटीच्या वातावरण पार पडली.येथील निवडणूक वरच्या स्थरावरून प्रतिष्ठेची केली होती.या निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून येथील निष्ठावंत कार्यकर्ते यांनी तन मन लावून ग्रामपंचायत ताब्यात घेण्यात यशस्वी झाले आहेत.तसेच पंचायत समितीचे सभापती सुध्दा काॅग्रेस पक्षाच्या ताब्यात घेतले होते.येथील काॅग्रेस पक्षातील कार्यकर्त्यास बुलंदतोफ म्हणून ओळखले जातात.या भागात आमिनशा फकीर यांनी पक्ष जिवंत ठेवण्यात कष्ट घेतात.बी.आर.पांडागळे यांनी तर भाविकांची सहल पंढरपूर ला वारी काढून जिल्हा परिषदेची जबाबदारी उचलली असल्याचे बोलले जात आहे.आगामी निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे नेते कोणाच्या नावाची घोषणा करतील याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे.