सहाव्या दिवशी देखील पावसाची संततधार; कोवळी पिके उन्मळून जाण्याच्या मार्गावर
हिमायतनगर,अनिल मादसवार| गत दोन वर्षाच्या तुलनेत अवघ्या महिन्या भराच्या पावसाळ्यात गेले ५ दिवसापासून पावसाची संततधार सुरूच आहे. त्यामुळे नदी - नाल्याच्या काठावरील हजारो हेक्टर जमिनीतील उभी पिके, जमिनीसह वाहून गेली. तर बहुतांश ठिकाणची पिके सडून-करपून उन्मळली आहेत. मागील अनेक वर्षापासून बळीराजा आर्थिक नुकसानीत येत असताना यावर्षी त्याही पेक्षा बिकट स्थिती म्हणजे कोवळ्या पिकांची झाली आहे. परिणामी संततधार पाऊस सुरु असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. या संकटातून सावरण्यासाठी हिमायतनगर तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकरी नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यातून केली आहे.
नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यामध्ये पावसाने ४५२.७० मि.मी. ऐवढी सरासरी गाठल्याने शेतक-यांकडील एकमेव उपजिवीकेचे साधन असलेली शेतजमीन नापिकी होण्याच्या मार्गावर आहे. यंदा मृग नक्षत्राच्या भरवश्यावर पेरलेली पिके पाऊस नसल्याने बहुतांश शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली होती. त्यानंतर गेल्या ५ दिवसापासून पावसाची रिपरिप सुरूच आहे, अधून मधून मुसळधार पाऊस होत असल्याने शेतात पाणी साचून राहत असल्याने कोवळी पिके उन्मळून जात आहेत. नाल्याच्या आणि नदीच्या काठावरील शेतकऱ्यांच्या पिकांची स्थिती तर भयावर झाली आहे. यामुळे मागे आड पूढे विहीर अशी वाईट स्थिती खचलेल्या बळीराजाची झाली. या पावसामुळे पिकांची झालेली अवस्था पाहून शासनाने हिमायतनगर तालुका ओला दुष्काळ जाहीर करावा. अशी मागणी शेतीवर उपजीविका भागविणाऱ्या सर्वसामान्य शेतकरी, मजुरदार, नागरीकातून केली जात आहे.
सन १९८३ मध्ये खरीप पेरणी काळात ३० वर्षांअगोदर पावसाने अशा प्रकारे थैमान घातले होते. तीच परिस्थिती यंदा निर्माण होते कि काय अशी चिंता सर्वाना लागली आहे. सततच्या पावसामुळे शेतधूरे, कोल्हापूरी बंधारे, जाळीचे बंधारे सर्वच जादा पावसाने तूटफुटीत आले असून, नदीकठा लगतचे शेतजमिनी खरडून गेले आहे. शेतात पाणी साचल्याने तलावाचे स्वरुप आले असून, या पावसामुळे अनेक पुलावरून पाणी जात असल्याने विविध गावाचा संपर्क तुटलेला आहे. तर अनेक घरामध्ये पाणी शिरल्याने मातीच्या घरासह चांगल्या घरांची देखील पडझड झाली आहे. यामुळे जनजीवन विसकळीत झाले असून, अशी बीकट परिस्थिती हिमायतनगर तालुक्यात झाली आहे.
पावसाची सरासरी कमी असली तरी पेरणी केलेली पिके कोवळी असताना आज सहाव्या दिवशी देखील अखंडित पाऊस सुरु आहे. त्यामुळे दर दिवसाला महसूल विभागाच्या व कृषी विभागाच्या कर्मचा-यांकडून सदृश्य स्थितीची पाहणी व्हावी. आणि हताश झालेल्या शेतक-यांना तातडीची मतद द्यावी अशी मागणी केली जात आहे. तालुक्यात पावसाची हि विदारक स्थिती असताना महसूल विभागाच्या लोकांकडून शेतकऱ्यांना व नागरिकांची साधी विचारपूसही होत नसल्याचा आरोप नुकसानग्रस्त शेतकरी व पुराच्या पाण्याने हैराण झालेल्या गावकऱ्यातून केला जात आहे.
उ. पे. प्र . पेनगंगा नगर/पूरनियंत्रण कक्ष इसापूर धरण
पुसद,उमरखेड,महागाव जिल्हा यवतमाळ, कळमनुरी जिल्हा हिंगोली, हदगाव, हिमायतनगर, माहूर, किनवट जिल्हा.नांदेड.
विषय:- _ऊर्ध्व पेनगंगा प्रकल्प -ईसापुर धरण दैनिक पाणी पातळी अहवाल वेळ 6 वाजता ----------------------------------------
प्रकल्पिय- 1.पूर्ण संचय क्षमता- 1279.06 दलघमी
2. उपयुक्त संचय क्षमता- 964.10 दलघमी
3.पूर्ण संचय पातळी- 441.00 मीटर
----------------------------------------
दिनांक 12/07/2022 वेळ 6:00 वाजता
१.पाणी पातळी 436.29 मी.
२.उपयुक्त पाणीसाठा- 535.6677 द.ल.घ.मी.
३.टक्केवारी- 55.5615%
४.दैनिक पाऊस - 5 मि.मी.
५.एकूण पाऊस - 338 मि.मि.
६.मागील 24 तासातीलआवक- 4.1131 दलघमी
७.एकूण आवक - 84.9572 दलघमी.
८. सांडवा गेट स्थिती - सर्व गेट बंद आहेत.
९. विसर्ग निरंक क्यूमेक्स
१०.सांडव्याद्वारे मागील 24 तासात सोडलेले पाणी
निरंक दलघमी एकूण निरंक दलघमी
स्वाक्षरीत - उपविभागीय अभियंता, - उर्ध्व पेनागंगा प्रकल्प उपविभाग क्रमांक 1, पेनगंगानगर.* प्रत. मा.कार्यकारी अभियंता उर्ध्व पेनगंगा प्रकल्प विभाग क्रमांक 1 नांदेड यांना माहितीस्तव