नांदेड। श्री उपिंदर सिंघ, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, नांदेड यांच्या अध्यक्षतेखाली आज दिनांक 7 जुलै, 2022 रोजी विभागीय रेल्वे सल्लागार समितीची पहिली बैठक संपन्न झाली. या बैठकीस नांदेड विभागातून विविध ठिकाणाहून 16 सदस्य उपस्थित झाले होते.
श्री जय पाटील , वरिष्ठ विभागीय वाणिज्य प्रबंधक, नांदेड यांनी नांदेड विभागाने गेल्या वर्षभरात केलेल्या विविध कार्याची माहिती दिली, रेल्वे प्रवाश्यांकारिता करत असलेल्या विविध कार्याचे सल्लागार समितीने कौतुक केले. नांदेड विभागात होत असलेल्या विविध विकास कामांची माहिती श्री जय पाटील यांनी उपस्थितांना दिली.
नांदेड रेल्वे विभागाने किसान रेल्वे च्या माध्यमातून देश भरात शेतमाल पाठवला या बद्दल उपस्थितांनी विशेष कौतुक केले. नांदेड रेल्वे विभागात जवळपास सगळे सेक्शन सिंगल लाईन रेल्वे पटरी असतांनाही रेल्वेने गेल्या वर्ष भरात गाड्या वेळेवर चालविल्या बद्दलही त्यांचे अभिनंदन केले.
सल्लागार समिती सदस्यांनी विविध स्थानकावर असलेल्या समस्यांचे समाधान करण्या करिता मागणी केली. नांदेड येथून हेमकुंड साहिब करिता नवीन रेल्वे सुरु करणे, मुंबई करिता नवीन रेल्वे सुरु करणे, अमरावती-पुणे रेल्वे पुन्हा सुरु करणे, उत्तर भारतात जाण्या करिता नवीन रेल्वे सुरु करणे , विविध एक्स्प्रेस मध्ये डब्बे वाढविणे आदी मागण्या मांडल्या. श्री उपिंदर सिंघ यांनी कळविले कि नांदेड विभागातून नवीन गाडी सुरु करण्यासाठी नांदेड विभाग दर वर्षी मुख्यालय कडे प्रस्ताव पाठवत आहे. पुढील निर्णय मुख्यालय तसेच रेल्वे बोर्ड घेतील.
श्री उपिंदर सिंघ यांनी सर्व सदस्यांना कळविले कि नांदेड विभागाने गत वर्ष भरात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. जालना येथे पिट लाईन, रेल्वे एलेक्ट्रीफिकेषण करणे, नांदेड-पुणे द्वी-साप्ताहिक एक्स्प्रेस ला नियमित करणे, हमसफर एक्स्प्रेस मध्ये स्लीपर कोच बसविणे, विविध स्थानकावर लिफ्ट बसवणे, चालत्या गाड्यात सफाई करण्यासाठी कंत्राट देणे, जगन्नाथ पुरी , बर्हेमपूर करिता विशेष गाड्या, अतिरिक्त डब्बे जोडणे, आदी.
नांदेड विभाग रेल्वे प्रवाश्यांकारिता जगन्नाथ पुरी, तिरुपती आणि जयपूर करिता विशेष रेल्वे चालवीत आहे. याचा प्रवाश्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री सिंघ यांनी केले