भावगीत, भक्तीगीते, गवळण अश्या एकापेक्षा एक सरस रचनांच्या सादरीकरणाने रसिक मंत्रमुग्ध !
नांदेड/हिंगोली। माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खा. हेमंत पाटील यांच्या संकल्पनेतून आजच्या पंधरा वर्षांपूर्वी सुरू झालेल्या आषाढी महोत्सवात मागील दोन वर्षांपासून कोरोनामुळे अडथळा निर्माण झाला होता. त्यामुळे नांदेडकरांना हा महोत्सव पुन्हा अनुभवता येणार की नाही अशी शंका वाटत होती. मात्र कोरोनामुळे रद्द करावा लागलेला हा कार्यक्रम पुन्हा सुरू करुन खासदार हेमंत पाटील यांनी नांदेडकर रसिकांना पुन्हा एकदा विठ्ठल भक्तीच्या रसात मंत्रमुग्ध केले.
शासकीय विश्रामगृहात रविवार ता.१० रोजी दिवाकर चौधरी प्रस्तुत " देवाचिये द्वारी " या विठ्ठल भक्तीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये " देव माझा विठू सावळा, मेघा गायकवाड यांनी गायलेले अबिर गुलाल उधळीत रंग , संजय जगदंबे यांच्या दुभंगुन जाता जाता मी अभंग झालो, वंदना हटकर यांनी जाऊ मी कशी मथुरेच्या बाजारी , या गवळणीने कार्यक्रमाची शोभा वाढविली तर श्याम 'तेरी बन्सी पुकारे राधा श्याम मीरा का भी श्याम तू राधा का भी श्याम, धरिला पंढरीचा चोर, चला जेजुरीला जाऊ, देश प्रेमियो... अपस मे प्रेम करो, दिल दिया है जान भी देंगे ये वतन तेरे लिये , अशी एकापेक्षा एक सरस, सुंदर भावगीत भक्तीगीते, गवळण देशभक्ती पर गीत सादर करुन रसिकांना मंत्रमुग्ध केले तर विजय जोशी यांनी गायलेल्या " कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर " या गीताने कार्यक्रमात रंगत आणली व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली . कार्यक्रमासाठी गायक म्हणून संजय जगदंबे, गायीका वंदना हटकर, मेघा गायकवाड यांनी गीत सादर केले त्यांना रतन चित्ते, गौतम, सिद्धू कदम यांनी साथ संगत केली.
आषाढी महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी खासदार हेमंत पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दत्ता पाटील कोकाटे, आनंद बोंढारकर, उमेश मुंडे, गोदावरी समूहाच्या अध्यक्ष राजश्री पाटील, तुलजेश यादव, सचिन किसवे , सामनाचे नांदेड जिल्हा प्रतिनिधी विजय जोशी , श्याम वानखेडे ,बालाजी पाटील भायेगावकर , गजानन कदम यांच्यासह शिवसैनिक पदाधिकारी यांची उपस्थिती होती. आषाढी महोत्सव पुन्हा एकदा सुरु झाल्यामुळे नांदेडकर रसिक प्रेक्षकांमध्ये चैतन्याचे वातावरण दिसून आले .